महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याला मास्टर ब्लास्टर म्हटले जाते. तेंडुलकरनं वन डेत १५९२१ आणि कसोटीत १८४२६ धावा केल्या आहेत. १०० आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे आणि त्याच्या नावावर २०१ विकेट्सही आहेत.
सचिननं नुकताच त्याचा ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आणि त्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह भारताची वॉल राहुल द्रविड याचेही नाव नाहीय. तेंडुलकरनं त्याच्या संघात ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस आणि सौरव गांगुलीचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलिया दिग्गज अॅडम गिलख्रिस्टही या संघात आहे. गोलंदाजी विभागात हरभजन सिंग, शेन वॉर्न, वासिम अक्रम व ग्लेन मॅकग्रा यांची निवड केली आहे.
सचिन तेंडुलकरची प्लेइंग इलेव्हन ( Sachin Tendulkar’s Playing XI) - वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, वासिम अक्रम, हरभनज सिंग व ग्रेन मॅकग्रा ( Virender Sehwag, Sunil Gavaskar, Brian Lara, Viv Richards, Jacques Kallis, Sourav Ganguly, Adam Gilchrist, Shane Warne, Wasim Akram, Harbhajan Singh, and Glenn McGrath.)
Web Title: No MS Dhoni and Virat Kohli in Sachin Tendulkar’s all-time best XI, check full list HERE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.