Mohammed Shami vs Hardik Pandya ( Marathi News ) - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी डिसेंबरमध्ये लिलाव पार पडला. पण, या लिलावापूर्वी झालेल्या ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतले आणि आयपीएल २०२४ साठी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडून काढून घेताना हार्दिककडे सोपवले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने पहिल्याच वर्षी ( २०२२) जेतेपद पटकावले होते, तर २०२३ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीने स्पष्ट मत मांडले.
हार्दिकच्या एक्झिटनंतर गुजरात टायटन्सने संघाचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवले गेले. नुकताच अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेल्या मोहम्मद शमीला हार्दिकच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला गेला. यावर शमीने खूपच स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, फ्रँचायझीने त्याला आयुष्यभरासाठी करारबद्ध केलेले नव्हते.
शमी सध्या घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे आणि तो वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या संघातही त्याचे नाव नाही आहे. शमीने गुजरातचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्याच्या निर्णयावरही आपले मत मांडले. त्याने म्हटले, शुबमन गिलही अनुभवी खेळाडू बनेल आणि भविष्यात तोही अन्य फ्रँचायझीकडून खेळताना दिसेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही कोणाला असं थांबवू शकत नाही आणि हा खेळाचा एक भाग आहे.
हार्दिकच्या निर्णयावर शमीचा बाऊन्सर!
''किसी को किसी के जाने से कोई फरक नही पडता... हार्दिकला जायचं होतं आणि तो गेला. गुजरातचा कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आणि संघाला दोन वेळा फायनलमध्ये घेऊन गेला. एक जेतेपद जिंकून दिलं. गुजरातने त्याला आयुष्यभरासाठी करारबद्ध केले नव्हते,''असे शमी म्हणाला.
Web Title: No one cares about anyone leaving the franchise; Mohammed Shami reacts to Hardik Pandya leaving Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.