Shahid Afridi to James Faulkner : पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शनिवारी मोठा धमाका झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स फॉल्कनरने PSLमधून माघार घेताना वेतन न दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ( PCB) केला. 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानधनाबाबत केलेल्या कराराचे पालन केले नाही. बोर्ड सतत माझ्याशी खोटं बोलत राहिलं', असा गंभीर आरोप फॉल्कनरने PCB वर केला. जेम्स फॉल्कनर हा PSL मधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. मात्र, तो स्पर्धा सोडून गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता फॉल्कनरला उत्तर देण्यासाठी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी मैदानावर उतरला आहे.
जेम्स फॉल्कनर काय म्हणाला?''पाकिस्तान क्रिकेट फॅन्सची मी मनापासून माफी मागतो, परंतु दुर्दैवाने मला PSLमधील अखेरच्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागल आहे आणि मी PSLलही सोडत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मला वेतनाबाबत दिलेला शब्द पाळला नाही. त्यांच्याशी याबाबत मी वारंवार चर्चा करत होतो, परंतु ते सतत खोटं बोलत राहिले,''असे फॉल्करनरे ट्विट केले.