BBL 13 (Marathi News) : बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यातल्या सामन्यात यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील होते. ग्लेन मॅक्सवेलच्या मेलबर्न स्टार्स संघाने १७३ धावांचे लक्ष्य उभे केले होते आणि सिडनी थंडरने १८.२ षटकांत ५ बाद १७६ धावा करून विजय मिळवले. ख्रिस ग्रीनच्या थंडर संघाने स्टार्सच्या ४ फलंदाजांना शेवटच्या षटकात माघारी पाठवले. त्यामुळे पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफला ( Haris Rauf) फलंदाजीसाठी यावे लागले. पण, फलंदाजीला येताना तो ना ग्लोव्ह्ज घालून आला, ना हेल्मेट... तो पॅडही बांधायला विसरला आणि तसाच क्रिजवर आल्याने हशा पिकला...
डॅनिएल सॅम्सने शेवटच्या षटकात ४ विकेट्स घेतल्या. त्याने २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ५९ धावा करणाऱ्या बियू वेबस्टरला बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर उसामा मीरची त्याने विकेट घेतली. मार्क स्टीकेटी रन आऊट झाल्याने सॅम्सची हॅटट्रिक हुकली. तेव्हा हॅरिस रौफ फलंदाजीला यावे लागले. घाईगडबडीत तो पॅड न घालताच फलंदाजीला आला. लिएम डॉवसन सहाव्या चेंडूवर बाद झाल्याने स्टार्सचा संपूर्ण संघ १७२ धावांत माघारी परतला.
सिडनी थंडर्सने १८.२ षटकांत ५ बाद १७६ धावा करून विजय पक्का केला. कॅमेरून बॅनक्रॉफ्ट ( ३०), अॅलेक्स हेल्स ( ४०) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. जेसन संघा ( १९), ऑलिव्हर डेव्हिस ( २३), अॅलेक्स रॉस ( १७), डॅनिएल सॅम्स ( २२*) यांनी विजयात योगदान दिले.
Web Title: No pads, no gloves and no helmet! Haris Rauf came out to bat without pads, a team hattrick caught him off guard, leaving him unprepared,Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.