Join us  

एक जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही; क्रिकेट मंडळाचा मोठा निर्णय

कोरोनाचं वाढत संकट लक्षात घेता जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 2:57 PM

Open in App

जगभरात कोरोना व्हायरसचे 27 लाख 34,102 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 1 लाख 91,189 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 7 लाख 51,408 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचं वाढत संकट लक्षात घेता जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे आणि ती कधी होईल, हे निश्चित सांगता येत नाही. अशात 1 जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी बराच काळ प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

गौतम गंभीरनं जपली माणुसकी; घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार

आयपीएलचे 13 वे मोसम 29 मार्चला सुरू होणार होते, परंतु ती 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. पण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) पुढील सुचना मिळेपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानं जगाला वेठीस धरलं आहे, त्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवरही संभ्रम आहे.  

सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय प्रवासातील दुर्मीळ फोटो

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. त्यांनी 1 जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर हा निर्णय घेतला गेल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं सांगितलं. ECBनं सांगितले की,'' 1 जुलैपर्यंत इंग्लंड आणि वेल्समध्ये कोणतेच व्यावसायिक क्रिकेट सामने होणार नाहीत. या कालावधीपर्यंत कौंटी चॅम्पियनशीपच्या सत्रातील 9 सामने रद्द होती, पण ते सामने सुधारीत वेळापत्रकानुसार खेळवले जातील. जूनमध्ये होणारी Vitality Blast स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे जुलै ते सप्टेंबर महिन्यात खेळवले जातील. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका आणि भारतीय महिला संघाविरुद्धची मालिकांच्या वेळापत्रकात बदल होईल.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या...

सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...

अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...

विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

2007मध्ये निवृत्ती घेणार होता सचिन तेंडुलकर, पण परदेशातून फोन आला अन्...

Irfan Pathanने समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे कान टोचले; करून दिली जबाबदारीची जाणीव

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंड