Join us  

ना रोहित ना कोहली, फक्त धोनी आणि धोनीच...

या वर्षी धोनीने 6 डावांमध्ये  150.50च्या सरासरीने 301 धावा बनवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 4:56 PM

Open in App

मुंबई : नवीन वर्ष सुरु झाले. दोन महिने उलटले. पण या दोन महिन्यांमध्ये ना रोहित शर्माचे नाव घेतले जाते किंवा ना विराट कोहलीचे नाव जास्त घेतले जाते. कारण सध्या चर्चा आहे ती फक्त आणि फक्त धोनीचीच. कारण महेंद्रसिंग धोनीची या वर्षातील कामिगरी डोळे दिपावणारी आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये पुन्हा एकदा तोच जुना धोनी पाहायला मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी धोनी विश्वचषकात खेळणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरु होती. पण या चर्चेला धोनीनेच आपल्या कामगिरीच्या जोरावर पूर्णविराम दिला आहे. या वर्षी धोनीने 6 डावांमध्ये  150.50च्या सरासरीने 301 धावा बनवल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश असूनतो चारवेळा नाबाद ठरला आहे. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी आठव्या स्थानावर आहे, तर सरासरीच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

धोनीने 2018 साली 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25च्या सरासरीने 275 धावा बनवल्या होत्या. गेल्या वर्षात धोनीला एकदाही अर्धशतक झळकावता आले नव्हते. पण गेल्या फक्त दोन महिन्यांमध्ये धोनीने चार अर्धशतक लगावली आहे. यापैकी तीनवेळा तो नाबाद राहीला आहे.

2019 वर्षातील धोनीची कामगिरी : 6 डाव301 रन नॉट आउट: 4 वेळासरासरी : 150.50स्ट्राइक रेट: 80.26अर्धशतक:  4

धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधव शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा केदार जाधव मॅच विनर ठरला. या सामन्यात केदारने धोनीच्या साथीने अभेद्य शतकी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर केदारची एक मुलाखत झाली. त्यामध्ये त्याने या भागीदारीचे वर्णन केले. त्याचबरोबर धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, हा विश्वासही त्याने व्यक्त केला.

यापूर्वीही बऱ्याचदा केदार आणि धोनी यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळते. याबद्दल केदारला विचारले असता त्याने धोनीवर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले आहे. धोनी जे बोलतो, त्यावर कोणताही विचार मी करत नाही. धोनी नेहमीच योग्य बोलतो. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याचा मान ठेवतो आणि डोळे बंद करून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, असे केदारने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीविराट कोहलीरोहित शर्मा