Shubman Gill Team India : युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल 2023 मध्ये भारतासाठी अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला. विशेषत: वनडे फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून स्फोटक शैलीने धावा झाल्या. तो यावर्षी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या 24 वर्षीय फलंदाजाने 2023च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी 9 सामन्यांमध्ये 354 धावा केल्या. आता या युवा फलंदाजाने आपला 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' खेळाडू कोण ते सांगितले आहे.
IPL 2024 साठी गुजरात संघाच्या कर्णधारपदी नियुक्त झालेल्या शुभमन गिलला एका पुरस्कार सोहळ्यात विचारले गेले की, 'सर्वकालिक महान खेळाडू कोण आहे?' शुबमनने गेल्या काही वर्षात विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी यांच्या दमदार खेळी पाहिल्या आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने यापैकी कोणाचेही नाव घेतले नाही. तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. शुभमनने उत्तर दिले, 'सर्वकालिन सर्वोत्तम कोण हे सांगणं खूप अवघड आहे. पण माझ्यासाठी सचिन सर सर्वोत्तम आहेत, कारण त्यांच्यामुळेच मी क्रिकेट खेळू लागलो. या प्रश्नाचं उत्तर मी सचिन तेंडुलकर असं देईन.' त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
SA दौऱ्यासाठी T20 आणि कसोटी संघाचा भाग
शुबमन गिलचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी आणि टी20 मालिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. शुभमन भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपल्या फलंदाजीने आपली छाप सोडली आहे. त्याने 18 कसोटीत आपल्या बॅटने 966 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 128 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने दोन शतके आणि 4 अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये 44 सामन्यात 2271 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 6 शतके, 1 द्विशतक आणि 13 अर्धशतके झळकावली. सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. त्याने 20 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 11 सामने खेळले असून 304 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. सर्वोच्च धावसंख्या 126 धावांची आहे.
Web Title: No Rohit Sharma Virat Kohli or MS Dhoni Shubman Gill Says Sachin Tendulkar is Best of All Time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.