ठळक मुद्देश्रेयस अय्यरला संघात स्थान न दिल्यानं सेहवागचा संतापकोहलीसोडून इतर सर्वांसाठी नियम आहेत का? सेहवागचा सवालकोहलीचं फलंदाजीचं स्थान का बदललं जात नाही? सेहवाग संतापला
नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला. मालिकेची सुरुवात जरी चांगली झाली असली तरी भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघाच्या निवडीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाच्या निवडीबाबत सेहवागने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत संघाचा कर्णधार विराट कोहलीवरही आपला संताप व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरला वगळून मनिष पांडेला खेळवण्यात आलं. यावर सेहवाने जोरदार टीका केली.
"गेला काही टी-२० सामन्यांमध्ये श्रेयसची कामगिरी चांगली राहिली आहे. चांगली कामगिरी करत असतानाही त्याला संघाबाहेर ठेवण्यामागचं कारण काय? मला वाटत नाही की श्रेयसमध्ये इतकी हिंमत असेल की तो याचा जाब विचारु शकेल. पण याचं कोहलीने द्यायला हवं", असं सेहवाग एका टेलिव्हिजन कार्यक्रमात म्हणाला.
"मला इथं आणखी एक मुद्दा नमूद करायचा आहे की संघात विराट कोहली सोडून इतर सर्वांना नियम लागू आहेत का? कोहलीबाबत कोणतेच नियम लागू का होत नाहीत? त्याच्या फलंदाजी क्रमवारीत केव्हाच बदल होत नाही आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नसेल तर त्याला संघाबाहेरही बसवलं जात नाही", असा संताप सेहवागने व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने चहलला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. चहलने संधीचं सोनं करत कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं आणि भारतीय संघाला विजय प्राप्त करुन दिला.
Web Title: no rules is applicable on virat kohli but all the rules are applicable to every one in team india says virender sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.