लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्याने जाहीर केलेल्या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या या संघात पाकिस्तानचेच पाच खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे चार आणि भारत व दक्षिण आफ्रिका यांचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्या तेंडुलकरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तेंडुलकरने 19 वर्षांच्या क्रिकेट क्रिकेट कारकिर्दीत सहा वर्ल्ड कप स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने वर्ल्ड कपमध्ये 44 डावांत 56.95च्या सरासरीने 2278 धावा केल्या आहेत. त्यात 16 अर्धशतकांचा व 6 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावला होता. धोनीने वर्ल्ड कप स्पर्धेतील 17 डावांत 42.25च्या सरासरीने 507 धावा केल्या आहेत.
पण, आफ्रिदीच्या या संघात स्थान पटकावणारा एकमेव भारतीय खेळाडू हा विराट कोहली आहे. विराटने वर्ल्ड कप स्पर्धेत 17 डावांत 41.92च्या सरासरीनं 587 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकं आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. 2019चा वर्ल्ड कप हा त्याचा तिसरा वर्ल्ड कप आहे.
शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड कप संघः सइद अन्वर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंझमाम उल-हक, जॅक कॅलिस, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, साकलेन मुश्ताक.
काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे
लाहोर : भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकापासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. त्याने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे.
काही महिन्यांपूर्वी आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावरून पाकिस्तान सरकारलाच घरचा आहेर दिला होता. तो म्हणाला की,'' पाकिस्तानला काश्मीर नकोय. तो भारतालाही देऊ नका. काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवंय. जेणेकरून माणुसकी जीवंत राहिल. तेथील लोकांना नरकयातना भोगण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानला खरचं काश्मीर नकोय.. त्यांना चार प्रांत सांभाळता येत नाहीत.''
आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात याच मुद्याचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की,''काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.''
Web Title: No Sachin Tendulkar, MS Dhoni in Shahid Afridi's all-time World Cup XI; only one Indian part of list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.