किंग्सटाऊन : स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाही, चेंडूवर थुंकीचा वापर करण्यास बंदी आणि सीमारेषेजवळ सॅनिटायझर. महामारीदरम्यान क्रिकेट सामन्यात तुमचे स्वागत आहे. कॅरेबियन देशांमध्ये या आठवड्यात क्रिकेटला सुरुवात झाली. सेंट विन्सेंटचे मुख्य शहर किंग्सटाऊनजवळ आर्नोस वेलवर सुरू विन्सी टी-१० प्रीमिअर लीगमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता ही छोटी स्पर्धा आहे, पण कोविड-१९ महामारीनंतर क्रीडा जगत ठप्प पडल्यानंतर कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये आयोजित होणारी ही पहिली स्पर्धा आहे.
सेंट विन्सेंटमध्ये सुरुवातीला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची आशा होती. कारण केवळ १८ रुग्ण मिळाल्यामुळे येथे कोविड-१९चे संक्रमण पसरण्याचा धोका फार कमी होता, पण असे घडले नाही. आता आशा आहे की जास्तीत जास्त ३०० ते ५०० प्रेक्षकांना मैदानात प्रवेश घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. स्थानिक प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक स्टार सुनील अंबरीशसारख्या खेळाडूचा खेळ बघण्याची संधी मिळेल.
पायाला पाय मारत जल्लोष
चेंडूवर थुंकीचा वापर करण्यास बंदी असलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. या व्यतिरिक्त सीमारेषेजवळ सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे आणि खेळाडूंचे तापमान सातत्याने तपासण्यात येत आहे. अंपायर्सनी चेहºयावर मास्क लावले आहे. वृत्तसंस्थेनुसार बळी घेण्याचा जल्लोष पायाला पाय लावून आणि मैदानावर ठोसे लगावण्याचा इशारा करीत साजरा करण्यात येत आहे.
Web Title: No spit on the ball, sanitizer on the border
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.