विराट कोहली, रोहित शर्मा यांना २०२०च्या वन डे संघात स्थान नाही, कसोटी संघात एकही भारतीय नाही

विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हे दोन दिग्गज..

By स्वदेश घाणेकर | Published: December 17, 2020 11:21 AM2020-12-17T11:21:35+5:302020-12-17T11:22:13+5:30

whatsapp join usJoin us
No Virat Kohli and Rohit Sharma in Wisden’s ODI Team of the Year 2020, No indian in Wisden’s Test Team   | विराट कोहली, रोहित शर्मा यांना २०२०च्या वन डे संघात स्थान नाही, कसोटी संघात एकही भारतीय नाही

विराट कोहली, रोहित शर्मा यांना २०२०च्या वन डे संघात स्थान नाही, कसोटी संघात एकही भारतीय नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हे दोन दिग्गज... वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं रोहितच्या नावावर आहेत, तर विराटनंही अनेक विक्रम नावावर केली आहेत. पण, Wisden ने जाहीर केलेल्या २०२०च्या वन डे संघात या दोघांनाही स्थान देण्यात आलेले नाही. तसेच २०२०च्या कसोटी संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. २०२०मध्ये झालेल्या कसोटी व वन डे मालिकेतील कामगिरीवर हे संघ निवडण्यात आले आहेत. 

Wisdenने कसोटी संघाचे नेतृत्व न्यूझीलंडच्या केन विलियम्सनकडे सोपवले आहे. त्यानं या वर्षी कर्णधार आणि फलंदाज म्हणून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. वन डे संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचकडे सोपवले आहे.  वन डे संघात विराट, रोहित, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही. पण, टीम इंडियाच्या लोकेश राहुल याचा यष्टिरक्षक- फलंदाज म्हणून संघात समावेश केला गेला आहे. ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजाला निवडले आहे.  

Wisden’s ODI Team of the Year 2020 - आरोन फिंच ( कर्णधार) , लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), स्टीव्हन स्मिथ, निकोलस पूरन, सॅम बिलिंग, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, अल्झारी जोसेफ, लुंगी एनगिडी, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा 

Wisden’s Test Team of the Year 2020 - डॉम सिब्ली, शान मसूद, केन विलियम्सन ( कर्णधार), मार्नस लाबुशेन, बाबर आझम, बेन स्टोक्स, क्विंटन डी'कॉक ( यष्टिरक्षक), कायले जेमिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, टीम साऊदी, नॅथन लियॉन

Web Title: No Virat Kohli and Rohit Sharma in Wisden’s ODI Team of the Year 2020, No indian in Wisden’s Test Team  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.