Virat Kohli : भारताच्या माजी खेळाडूनं २०२१ वर्षातील कसोटी संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना वगळलं!

विराट कोहलीनं या वर्षात ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:21 PM2021-12-13T12:21:10+5:302021-12-13T12:23:03+5:30

whatsapp join usJoin us
No Virat Kohli, Jasprit Bumrah In Aakash Chopra's Test Team Of 2021 | Virat Kohli : भारताच्या माजी खेळाडूनं २०२१ वर्षातील कसोटी संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना वगळलं!

Virat Kohli : भारताच्या माजी खेळाडूनं २०२१ वर्षातील कसोटी संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना वगळलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाची २०२१मधील कामगिरी समाधानकारक झाली,  असंच म्हणावं लागेल. कसोटी संघाचा विचार कराल तर विराट कोहली शिवाय भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २-१ असा मालिका विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर २-१ अशी आघाडी घेतली आहे.  पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून हार मानावी लागली. विराट कोहलीनं या वर्षात ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर बीसीसीआयनं त्याच्याकडून वन डे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले. आता भारताच्या माजी खेळाडूनं जाहीर केलेल्या २०२१वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात विराटला स्थान नाकारण्यात आले आहे. विराटसह जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हाही या संघातून गायब आहे.

भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) यानं या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला. त्याच्या या संघात विराट व जसप्रीत यांना स्थान न मिळाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराटनं कसोटीत धावा केल्या, परंतु त्याचे मोठ्या खेळीत रुपातंर करण्यात तो अपयशी ठरला, त्यामुळे त्याला वगळले गेले, असे चोप्रानं सांगितले. चोप्राच्या या कसोटी संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड यांचे प्रत्येकी दोन, तर श्रीलंकेच्या एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत याच्यासह ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज व कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यालाही चोप्रानं त्याच्या संघात घेतलेले नाही.  चोप्रानं त्याच्या या संघाचे नेतृत्व केन विलियम्सनकडे सोपवले आहे.

आकाश चोप्राचा कसोटी संघ - रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, जो रुट, केन विलियम्सन ( कर्णधार), फवाद आलम, रिषभ पंत, कायले जेमिन्सन, आर अश्विन, अक्षर पटेल, जेम्स अँडरसन, शाहिन आफ्रिदी. ( Aakash Chopra Test Team: Rohit Sharma, Dimuth Karunaratne, Joe Root, Kane Williamson (c), Fawad Alam, Rishabh Pant (wk), Kyle Jamieson, Ravichandan Ashwin, Axar Patel, James Anderson, Shaheen Afridi) 
 

Web Title: No Virat Kohli, Jasprit Bumrah In Aakash Chopra's Test Team Of 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.