ना विराट, ना रोहित... विस्डेननं 'या' खेळाडूला ठरवलं 'क्रिकेटर ऑफ द इअर'!

विस्डेननं त्याला 'क्रिकेटर ऑफ द इअर' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 01:27 PM2018-03-16T13:27:09+5:302018-03-16T13:28:03+5:30

whatsapp join usJoin us
No Virat, no Rohit ... Wisdenian decided to make this player 'Cricketer of the Year'! | ना विराट, ना रोहित... विस्डेननं 'या' खेळाडूला ठरवलं 'क्रिकेटर ऑफ द इअर'!

ना विराट, ना रोहित... विस्डेननं 'या' खेळाडूला ठरवलं 'क्रिकेटर ऑफ द इअर'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात भारतीय संघानं सांघिक कामगिरीच्या बळावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल कामगिरी केली होती. विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह, शिखर धवन आणि भुवनेश्वर यांनी गेल्यावर्षी कामगिरीत सातत्या दाखवले होते. विस्डेनच्या सहाव्या आवृत्तीच्या कवर पेजवर केएल राहुल झळकला आहे. गेल्य वर्षभरात त्यानं टी-20मध्ये केलेल्या कामगिरीमुळं विस्डेननं त्याला 'क्रिकेटर ऑफ द इअर' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

टी-20मध्ये केएल राहुलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षा आधिक सरासरी आहे. राहुलने टी-20मध्ये 50.90च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 50.85च्या सरासरीने धावा केल्या आहेत. राहुलच्या नावावर एक शतकही आहे. विस्डेननं महिला वर्ल्डकप विजेत्या संघाचा फोटोही छापला आहे. त्याचबरोबर भारतीय महिलांच्या कामगिरीवरही त्यांनी लिहले आहे. विराट कोहली सर्वाधिक यशस्वी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिला आहे. आगामी दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या मालिकवर त्याचे लक्ष असेल. 

सुरेश मेनन यांनी संपादकीयममध्ये कोहलीच्या खेळाची स्तुती केली आहे.  क्रिकेटमधील आकड्याबदद्ल विराट कोहलीला सध्या तोड नाही. तो ज्या गतीने धावा करतोय असे वाटतेय कि क्रिकेटमध्ये अशक्यप्राय विक्रम तो प्रस्थापित करेल, भारतीय उपखंडाबरोबरच परदेशातही तो खोऱ्यानं धावा करत आहे. 

महिलामध्ये दीप्ति शर्माला 'क्रिकेटर ऑफ द इअर' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तर भारताची पहिली महिला सुपरस्टार शांता रंगास्वामी यांना  विस्डेन हॉल आफ फेममध्ये इरापल्ली प्रसन्ना यांच्यासोबत ठेवलं आहे.  सर्वश्रेष्ठ क्रिकेटमध्ये प्रियांक पांचाल, हसन अली आणि तामिम इकबाल यांचीही नावे सामाविष्ठ करण्यात आली आहेत. 

Web Title: No Virat, no Rohit ... Wisdenian decided to make this player 'Cricketer of the Year'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.