चंदिगड - अनुसूचित जातींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी पंजाब-हरियाणा हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. (Yuvraj Singh News) यावेळी वरिष्ठ अधिवक्ता पुनीत बाली यांनी युवराज सिंगच्यावतीने हजर राहत हायकोर्टाच्या बेंचसमोर सांगितले की, या प्रकरणी एक रिजॉईंडर फाइल करायचे आहे. त्यासाठी त्यांना वेळ देण्यात यावा. त्यावर तक्रारदार रजत कलसन यांचे वकील अर्जुन श्योराम यांनी सांगितले की, या प्रकरणी आधीच खूप वेळ दिला गेला आहे. आज हजर राहण्यासाठी अंतिम युक्तिवादासाठी दिवस मुक्रर करण्यात आला होता. ते या प्रकरणी चर्चा करू इच्छितात. त्यामुळे या प्ररकणाचा युक्तिवाद ऐकला जावा. (peration in police investigation, High Court slaps Yuvraj Singh, what exactly is the case?)
त्यानंतर हायकोर्टाच्या बेंचने सरकारी वकिलांना तपासाचा स्टेटस विचारून विचारणा केली की, या प्रकरणात युवराज सिंगला सहभागी करण्यात आले आहे का? त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की युवराज सिंग एकदा तपासामध्ये सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही. तसेच आपला मोबाईल फोनही पोलिसांना दिलेला नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर न्यायालयाने युवराज सिंगच्या वकिलांना फटकार लगावत सांगितले की, जर तुम्ही तपासात सहकार्य केले नाही तर तुमच्या अशिलावरील कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे ती उठवण्यात न्यायालय मागे पुढे पाहणार नाही. त्यावर युवराज सिंगच्या वकिलांनी सांगितले की, याचिकाकर्ता युवराज सिंग हा दुबईमध्ये गेला आहे. तिथून आल्यावर तो तपासामध्ये सहकार्य करणार आहे. त्यावर तक्रारदारांचे वकील अर्जुन श्योराण यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणी लवकरची तारीख देण्यात यावी, त्यावर कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी करण्याचे निश्चित केले. या दिवशी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला जाईल. तसेच कुठलाही पक्ष एखादे कागदपत्र अथवा जबाब नोंदवणार असेल तर त्याने तो या तारखेच्या आधी करावा, असेही कोर्टाने सांगितले.
काय आहे प्रकरण अनुसूचित जातींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप युवराज सिंगवर करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात दलित अधिकार कार्यकर्ते रजत कलसन यांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत तसेच इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हे गुन्हे रद्द करण्यासाठी युवराज सिंगने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने युवराज सिंगविरोधात कठोर कारवाई करण्यास स्थगिती दिली होती.