Join us  

Anand Mahindra: "शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांनी विराट-ईशानचे केले कौतुक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या खेळीचे कौतुक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:26 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संध सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. खरं तर भारताने मालिका गमावली असली तर शनिवारी झालेला अखरेचा सामना अविस्मरणीय केला. संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने द्विशतक ठोकून इतिहास रचला. तर किंग कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ७२वे शतक झळकावले. जवळपास १२०० दिवसांनंतर विराटने वन डे मध्ये शतकी खेळी केली.

ईशान किशनने रचला इतिहासदरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात अखेरच्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने ईशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. किशनने या संधीचा पुरेपुर फायदा घेत शानदार खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे भारताकडून द्विशतक ठोकणारा ईशान किशन हा चौथा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद २०० करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला, त्याने केवळ १२६ चेंडूत द्विशतक झळकावले.

विराट कोहलीने शानदार फॉर्ममध्ये असलेल्या युवा किशनला चांगली साथ दिली. विराटने ९१ चेंडूत ११३ धावांची खेळी केली, तर किशनने १३१ चेंडूत २१० धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ४०९ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशच्या संघाला अपयश आले. अखेर भारताने तब्बल २२७ धावांनी अखेरचा सामना आपल्या नावावर केला. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशन या ४ भारतीय खेळाडूंनी वन डे मध्ये द्विशतक करण्याची किमया साधली आहे. 

आनंद महिंद्रा यांचं ट्विट चर्चेत विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट सर्वांचे लक्ष वेधत आहे. वन डे मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ यजमान संघाविरूद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला १४ डिसेंबरपासून सुरूवात होईल. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारत विरूद्ध बांगलादेश कसोटी मालिका

  • १४-१८ डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
  • २२-२६ डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीइशान किशनआनंद महिंद्राभारतीय क्रिकेट संघ
Open in App