अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाचा मुद्द्यावर लोकं निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्येही अशा वर्णद्वेषी घटना घडत असल्याचा दावा डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनी केला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना सहकाऱ्यांकडून वर्णद्वेषी टिप्पणी होत असल्याचा दावा सॅमीनं करताना खळबळ उडवली. आता टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं वर्णद्वेषावर स्पष्ट मत मांडलं आहे. त्यानं हे मत मांडताना अप्रत्यक्षपणे मुस्लीम लोकांना सोसायटीमध्ये घर नाकारण्याच्या वृत्तीवर टीका केली.
टीम इंडिया 'आशिया चषक'साठी पाकिस्तानात जाणार? जाणून घ्या आशियाई परिषदेच्या बैठकीतील निर्णय
इरफाननं ट्विट केलं की,''वर्णद्वेष हा केवळ एखाद्याच्या रंगापर्यंत मर्यादित नाही. तुमचा धर्म दुसरा आहे म्हणून तुम्हाला सोसायटीत घर नाकारलं जातं, हेही वर्णद्वेष आहे.''
सॅमीनं मंगळवारी पोस्ट केला आणखी एक व्हिडीओ...
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार सॅमीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळताना वर्णद्वेषी टिप्पणीला सामोरे जावे लागल्याचा दावा केला. सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडू आपल्याला 'कल्लू' म्हणून बोलवायचे, असे त्यानं सांगितले.
या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नव्हता आणि आता त्यानं त्या खेळाडूंना मॅसेज करायला सुरूवात केली आहे, जे त्याला कल्लू म्हणून बोलवायचे. तो म्हणाला,''मी जगभरात अनेक लीगमध्ये खेळलो आणि मला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अनेक खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर केला आहे. पण, जेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ समजला, तेव्हा मला राग अनावर झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना मला त्या शब्दानं खेळाडू बोलवत होते. त्या शब्दानं कृष्णवर्णीयांचा अन्याय होतो, हे मला आता समजले.''
त्या नावानं सतत बोलावलं जायचं आणि सहकारी हसायचे, असेही तो म्हणाला.''मला त्या नावानं हाक मारणाऱ्या प्रत्येकाला मी मॅसेज केला आहे. तुम्ही मला त्या नावानं बोलवायचा, तेव्हा त्याचा अर्थ हा घट्ट नातं असं असेल मला वाटायचे. मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. तुम्ही माझा अपमान करत होता. मी तुम्हाला मॅसेज केला आहे. मला तुम्ही नक्की कोणत्या हेतूनं त्या नावानं बोलवायचा? त्यामुळे मला उत्तर द्या. जर तुम्ही अनादर करत असाल, तर मला खूप वाईट वाटेल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
इशांत शर्मा अडचणीत सापडणार? डॅरेन सॅमीवरील सहा वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल!
सोशल डिस्टन्सिंगसाठी बंद केलं स्टेडियम, पण Viral Videoचा शेवट पाहून बसेल धक्का!