Join us

वरिष्ठ संघात निवड न होणे निराशाजानक - श्रेयस अय्यर

कामगिरीत सातत्य राखल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे कधी-कधी माझ्या कामगिरीवर परिणाम होतो, असे भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 03:45 IST

Open in App

बेंगळुरू : कामगिरीत सातत्य राखल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे कधी-कधी माझ्या कामगिरीवर परिणाम होतो, असे भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटले आहे.पत्रकारांसोबत बोलताना अय्यर म्हणाला,‘संयम राखणे कठीण असते. कामगिरीत सातत्य राखल्यानंतर आणि धावा फटकावल्यानंतर सीनिअर संघात स्थान मिळाले नाही तर ते तुमच्या मनाला बोचते. उच्च पातळीवर खेळत असताना दिग्गज गोलंदाजांविरुद्ध तुमच्या कामगिरीमध्ये चढ - उतार येतो. तुम्हाला लक्ष केंद्रीत ठेवावे लागते, पण अनेकदा परिणाम होतोच.’देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर अय्यरला एकदिवसीय संघात स्थान मिळाले होते. त्याने यंदा फेब्रुवारीत द. आफ्रिकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. गेल्या वर्षी अय्यरने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघातर्फे ३१७ धावा केल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्याची आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने निवड केली आणि दोन मोसमानंतर तो कर्णधार झाला. (वृत्तसंस्था)कर्णधारपदामुळे दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगताना अय्यर म्हणाला,‘मला कर्णधारपद भूषविणे आवडते. कर्णधार असताना माझे वर्तन बदलते आणि दडपणाच्या स्थितीत आपल्यासाठी व संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो.’

टॅग्स :क्रिकेटबातम्या