- कृष्णम्माचारी श्रीकांत लिहितात...
टी२० विश्वचषकासाठी आता अवघे दहा महिने शिल्लक आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका भारतीय संघासाठी स्वत:ला सिद्ध करणारी ठरू शकेल. संघ बांधणी करताना स्वत:मधील उणिवा देखील दूर करता येतील,अशी आशा आहे. बांगालादेशकडून टी२० मध्ये झालेला एक पराभव डोळे विस्फारणारा ठरला. या प्रकारात कुठल्याही संघाला तुम्ही गृहीत धरु शकत नाही. कोणताही सामना जिंकण्यासाठी एक वैयक्तिक कामगिरी पुरेशी असते. विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनामुळे भारत बलाढ्य संघासह उतरणार आहे. मात्र जसप्रीत बुमराह संघात परतेल तेव्हा खऱ्यार्थाने संघाच्या कामगिरीचे आकलन होईल.टी२० त विंडीज संघ शानदार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अशावेळी पाहुणा संघ भारतापुढे कडवे आव्हान सादर करेल. या मालिकेसाठी विंडीज संघात अनेक दमदार नावे आहेत. सोबतच अनेक दिग्गज खेळाडू या दौºयासाठी आलेले नाहीत. किएरॉन पोलार्डच्या नेतृत्वात विंडीज संघ उत्कृष्ट कामगिरी बजावेल असा मला विश्वास वाटतो. विंडीजने भारतात अफागाणिस्तानविरुद्ध मालिका जिंकली. याचा त्यांना भारताविरुद्ध लाभ होणार आहे.भारताला सलामीवीर म्हणून लोकेश राहुल याच्यावर विश्वास टाकावा लागेल.आता शिखर धवनच्या पुढे जावून विचार करण्याची वेळ आली आहे. वेगवान सुरुवात ही काळाची गरज आहे. नेमका याच गोष्टीत भारतीय संघ अलिकडे अपयशी ठरला. डाव सावरण्यासाठी कोहलीसह अन्य काही फलंदाज सक्षम असतीलही मात्र मोठ्या सामन्यात ही गोष्ट सिद्ध होऊ शकलेली नाही. मागील, काही वर्षांतील आयसीसी स्पर्धा याचे बोलके उदाहरण ठरावे.भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट आहेच. रवींद्र जडेजाच्या पुनरागमनानंतर फिरकी गोलंदाजीतही चढाओढ वाढली. संघासाठी हे चांगले लक्षण आहे.क्षेत्ररक्षणातही भारतीय संघाने चांगली प्रगती साधली.हैदराबादची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. शिवाय येथील मैदानही वेगवान आहे. यामुळे फलंदाजांना आतिरिक्त मदत होईल, तर गोलंदाज अडचणीत येतील. ही मालिका अत्यंत रोमहर्षक होणार आहे. त्यातही यजमान भारतीय संघ क्षमतेनुसार खेळल्यास विंडीज संघावर एकतर्फी विजय मिळविण्यास फारशी अडचणही जाणवणारनाही. (टीसीएम)