virender sehwag on team india । मुंबई : सध्या भारतीय क्रिकेट संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह शस्त्रक्रियेमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. याशिवाय पाठीच्या समस्येमुळे मधल्या फळतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. अशातच संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींवर मोठे विधान केले आहे.
दरम्यान, सततच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल आपले प्रामाणिक मत मांडताना महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने म्हटले की, क्रिकेटच्या खेळात वेट लिफ्टिंगला अजिबात स्थान नाही. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय खेळाडू त्यांच्या वर्कआउट रूटीनमुळे जखमी होत असल्याचे सेहवागने म्हटले आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अलीकडेच हाताच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. याबाबत बोलताना वीरूने म्हटले, "क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत क्वचितच दुखापतीचा सामना केला."
प्रत्येकजण विराट कोहली होऊ शकत नाही - सेहवाग
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज सेहवागला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जाते. त्याने सांगितले की, त्याच्या काळात खेळाडूंनी वेट लिफ्टिंगला कधीच प्राधान्य दिले नाही. प्रत्येकजण विराट कोहली असू शकत नाही, अशा शब्दांत वीरूने किंग कोहलीच्या तंदुरूस्तीचे विशेष कौतुक केले.
वीरेंद्र सेहवागने TRS Clipsच्या युट्यूब पॉडकास्टवर बोलताना म्हटले, "आम्ही आमच्या काळात कोणतेही वजन उचलण्याचा सराव केला नाही, पण तरीही आम्ही दिवसभर खेळायचो. हा विराट कोहलीचा फंडा असू शकतो पण प्रत्येकजण कोहली नाही. प्रत्येक खेळाडूनुसार तुम्ही वेगळा प्रशिक्षण दिनक्रम तयार केला पाहिजे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Not everyone can be Virat Kohli Virender Sehwag makes big statement on constant injuries among Indian team players like jasprit bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.