Join us  

फ्रेंचाइजींना नाराज करुन चालणार नाही

अजूनही भारतीय सरकारकडून मान्यता मिळणे बाकी आहे. तसेच आयपीएल फ्रेंचाइजींच्याही काही शंका आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 4:34 AM

Open in App

- अयाझ मेमनक्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे ती आयपीएलची. बीसीसीआयने यूएई क्रिकेट बोर्डाला आणि सरकारला स्पर्धा आयोजनास मंजुरी देण्यासाठी पत्र लिहिले आहे. स्पर्धेसाठी १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर असा कालावधीही निश्चित झालेला आहे.अजूनही भारतीय सरकारकडून मान्यता मिळणे बाकी आहे. तसेच आयपीएल फ्रेंचाइजींच्याही काही शंका आहेत. किती नुकसान होणार, किती फायदा होणार किंवा खर्च किती करावा लागणार याबाबत फ्रेंचाइजी आणि बीसीसीआयमध्ये अजूनही चर्चा झालेल्या नाहीत. त्यामुळे फ्रेंचाइजी मालकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. यासाठी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांना लवकरात लवकर प्रत्येक फ्रेंचाइजीसोबत चर्चा करावी लागेल. कोरोना विषाणूच्या संकटामध्ये खेळविण्यात आलेली इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका रोमांचक झाली. आणि कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे प्रेक्षक या मालिकेचा आनंद घेतील का, अशीही शंका होती. मात्र क्रिकेटप्रेमींनी टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून या मालिकेचा आनंद घेतला. ज्या प्रकारे विंडीजने पहिला सामना जिंकला, ते पाहून असे वाटले की, आता विंडीज संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. पण असे झाले नाही, त्यामुळेच त्यांच्या पराभवामुळे काहीसे दु:खही झाले.च्विंडीजने शानदार सुरुवात करताना पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. मात्र यानंतर इंग्लंडने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आणि तिसऱ्या सामन्यात एकतर्फी वर्चस्व राखताना मालिका दिमाखात जिंकली. हा मालिका विजय इंग्लंडसाठी सोपा नव्हता. कारण त्यांनी सलामीचा सामना गमावला होता. मालिकेत सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर बाजी मारण्याची कामगिरी खूप कमी संघांनी केली आहे. २००१ मध्ये भारताने बलाढ्य आॅस्टेÑलियाला याच प्रकारे नमविले होते.च्या मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडची कामगिरी जबरदस्त झाली. तो ३४ वर्षांचा असून वेगवान गोलंदाजासाठी हे वय साधारणपणे निवृत्तीचे असते. मात्र ब्रॉडने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी न मिळाल्यानंतर त्याने दुसºया आणि तिसºया कसोटीत भेदक मारा केला. इंग्लंडसाठी या मालिकेत दोन वेगवान गोलंदाज महत्त्वपूर्ण ठरले, एक म्हणजे ब्रॉड आणि दुसरा जेम्स अँडरसन.

टॅग्स :आयपीएल 2020