आयपीएलच्या अकराव्या सत्रात नवख्या खेळाडूंवरही कोट्यवधींची बोली लागत असताना भारतीय कसोटी संघाचा सर्वाधिक शैलीदार आणि सर्वात भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारावर मात्र कोणीही बोली लावली नाही. चेतेश्वर पुजारावर बोली न लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. एप्रिलमध्ये देशातील आघाडीचे क्रिकेटपटू आयपीएल खेळत असताना कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा भारताच्या इंग्लंड दौ-याचा होमवर्क सुरू करणार आहे. या काळात पुजारा इंग्लिश काउंटी संघ यॉर्कशायरकडून डिव्हिजन एकमध्ये खेळेल. त्याचे लक्ष ऑगस्ट महिन्यात इंग्लंड विरोधात होणा-या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीवर असणार आहे.
का नाही झालं आयपीएलमध्ये सिलेक्शन -पुजारावर आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने बोली लावली नाही. sportskeeda.com ने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन कारणीभूत असल्याचं मत स्वतः पुजाराने व्यक्त केलं आहे. लोकांच्या दृष्टीकोनाने महत्वाची भूमिका बजावली. लिस्ट ए गेममध्ये (88 सामन्यांमध्ये 58 पेक्षा जास्त सरासरी) माझं प्रदर्शन चांगलं राहीलं आहे आणि टी-20 मध्ये 58 सामन्यांत 105.18 च्या स्ट्राइकरेटने धावा केल्या आहेत. छोट्या फॉर्मेटमध्ये मी आणखी चांगला खेळ करू शकतो. पण मला अजिबात चिंता नाहीये, कधीतरी मला संधी मिळेल हे मला माहितीये असा विश्वास पुजाराने व्यक्त केला. याबाबत वृत्त दिलं आहे. काय म्हणाला पुजारा -‘मी काउंटी सत्रात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. कारण आम्ही ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहोत. 2015 मध्ये मी यॉर्कशायरसोबत होते. तेव्हा आम्ही काऊंटी चॅम्पियनशिप पटकावली होती. हा एक शानदार संघ आहे. या संघात अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे मला उत्कृष्ट क्रिकेटपटू होण्यात मदत मिळाली.’ पुजाराच्या मते काऊंटी क्रिकेट खेळल्याने भारत दौ-याआधीच त्याला मैदान, खेळपट्टीबाबत चांगली माहिती मिळेल.पुजारा म्हणाला की, ‘इंग्लंडमध्ये या सत्रात सुरुवातीला हेडिंग्लेमध्ये खेळणे ही कोणत्याही फलंदाजाच्या तंत्राची परीक्षा असते. कारण येथे तापमान चार ते सहा डिग्री असते. येथे 50 धावा करणेदेखील कठीण होते. मात्र जेव्हा भारताचा दौरा सुरू होईल, तेव्हा वातावरण प्रफुल्लीत होईल.’