रोहित शर्मा हा जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. या स्टार फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत असे अनेक विक्रम केले आहेत, जे क्वचितच कुणी मोडू शकेल. जसे 264 धावा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्याच नावावर आहे. त्याने 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी 264 धावां फटकावल्या आहेत. साहजिकच त्याचा हा विक्रम मोडणे सोपे नाही. मात्र, या 'हिटमॅन'च्या नावावर एक असाही विक्रम आहे, जो मोडणे एखाद्या स्वप्नासारखे आहे.
रोहित शर्माचा हा वश्वविक्रम मोडणे अवघड -
रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकत्रितपणे सर्वाधिक षटकार ठोकणारा क्रेकिटेर आहे. T20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेल्या रोहितने आतापर्यंत 483 सामन्यांच्या कारकिर्दीत 620 षटकार ठोकले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण रोहित व्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला 600 षटकारांचा आकडा गाठता आलेला नाही. रोहितने वनडेमध्ये 331, टी-20मध्ये 203 आणि कसोटी सामन्यांत 84 षटकार ठोकले आहेत. रोहितनंतर, दुसरा क्रमांक येतो ख्रिस गेलचा. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
कमी सामने खेळूनही महाविक्रम -
असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत रोहित शर्मापेक्षाही (483 सामने) अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, मात्र, त्यांना 500 षटकारांपर्यंतही पोहोचता आलेले नाही. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने 524 सामने खेळत 476 षटकार ठोकले आहेत. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 538 सामने खेळत 359 षटकार ठोकले आहेत. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याने 586 सामने खेळत 352 षटकार ठोकले आहेत. तर सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने केवळ 264 षटकार ठोकले आहेत.
T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक षटकार -
रोहित शर्माने याच वर्षात भारताला T20 विश्वचषक जिंकून दिला आहे. यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रमही रोहितच्याच नावे आहे. रोहितने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 159 सामने खेळत 205 षटकार ठोकले आहेत. या फॉरमॅटमध्ये 200 षटकारांचा आकडा गाठणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. दुसरा क्रमांक न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर मार्टिन गप्टिलचा आहे, त्याने 173 षटकार ठोकले आहेत.
वनडेमध्येही होऊ शकतो नंबर-1 -
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. याशिवाय त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्येही नंबर-1 बनण्याची संधी आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 331 षटकार ठोकले आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी तेने सर्वाधिक 351 षटकार ठोकले आहेत. या फॉरमॅटमध्ये नंबर-1 सिक्स हिटर बनण्यासाठी रोहितला आणखी 21 षटकारांची आवश्यकता आहे.
Web Title: not only 264 runs An even bigger record on the name of Rohit Sharma Breaking is like a dream
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.