ना रोहित, ना पोलार्ड; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील 'या' खेळाडूचा आहे जबरा फॅन!

रोहित शर्मा हा इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL ) सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर केली आहेत. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:41 AM2022-01-29T11:41:16+5:302022-01-29T11:41:52+5:30

whatsapp join usJoin us
Not Rohit Sharma! Arjun Tendulkar snubs Mumbai Indians skipper as he picks favourite player from franchise | ना रोहित, ना पोलार्ड; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील 'या' खेळाडूचा आहे जबरा फॅन!

ना रोहित, ना पोलार्ड; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील 'या' खेळाडूचा आहे जबरा फॅन!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित शर्मा हा इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL ) सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर केली आहेत. पण, मुंबई इंडियन्सच्या यशाचा रोहित हा एकटाच स्टार नाहीत, तर किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या,  क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, इशान किशन याही स्टार्सचा सहभाग आहे. या सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. 

मुंबई इंडियन्समधील सर्वात फेव्हरिट ( आवडता) खेळाडू कोण, असा प्रश्न जेव्हा अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) याला विचारण्यात आला. तेव्हा त्यानं रोहित शर्माचं नावही घेतलं नाही. त्याच्या उत्तरात किरॉन पोलार्डही नव्हता. अर्जुननं यावेळी प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा संघातील आवडता खेळाडू असल्याचे सांगितले. त्यानं इंस्टाग्रामवर हे उत्तर दिले. 


आयपीएल २०२१च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं २० लाखांच्या बेस प्राईज ( मुळ किंमत) मध्ये अर्जुनला ताफ्यात दाखल करून घेतले होते, परंतु तो एकही सामना खेळला नाही. आता आयपीएल २०२२ साठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये अर्जुनला मुंबई इंडियन्स पुन्हा ताफ्यात घेतील का याची उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना ताफ्यात कायम राखले आहे.

मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. २० जानेवारी ही नोंदणीसाठीची अखेरची तारीख होती. या १२१४ खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २०१८नंतर हे पहिलेच मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएलच्या या पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी आल्यानं हे मेगा ऑक्शन  होत आहे. दहा फ्रँचायझींनी आतापर्यंत ३३८ कोटी रुपये खर्च करून ३३ खेळाडूंना करारबद्ध केले आहे आणि आता २१७ खेळाडूंसाठी ५६०.५ कोटींचा वर्षाव लिलावात होताना दिसणार आहे. १२१४ पैकी फक्त २१७ खेळाडूंना आयपीएलची लॉटरी लागणार आहे आणि त्यात ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे.
 

 

Web Title: Not Rohit Sharma! Arjun Tendulkar snubs Mumbai Indians skipper as he picks favourite player from franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.