आपल्या झंझावाती गोलंदाजीने जगभरातील अनेक फलंदाजांना धडकी भरवणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) एका भारतीय फलंदाजासमोर मात्र 'फुस्स' व्हायचा. शोएब अख्तरच्या मते, एका भारतीय फलंदाजाला बाद करण्यासाठी त्याला अक्षरशः घाम फुटत होता. एकदा शोएब अख्तरने स्वतःच याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता, सचिन तेंदुलकर (Sachin Tendulkar) सारख्या महान फलंदाजाला बाद करणे, एक वेळ सोपे होते. मात्र भारताची भिंत पाडणे अत्यंत कठीण.
या भारतीय फलंदाजासमोर शोएबलाही घाम फुटायचा -
एकदा शोएब अख्तर म्हणाला होता, माझ्यासाठी राहुल द्रविडला बाद करणे सचिन तेंडुलकर पेक्षाही अधिक कठीण काम होते. राहुल द्रविडला गोलंदाजी करणे अत्यंत कठीण होते. एवढेच नाही तर, द्रविड समर्पण आणि योग्यतेमुळे आपल्याला सहजपणे खेळून घेत होता, असेही त्याने म्हटले होते.
'जर एखादा फलंदाज द्रविड प्रमाणे लेट खेळत असेल तर आम्ही त्याला विकेट जवळून लेंथ बॉल टाकायचो आणि बॅट व पॅड मधून गॅप शोधायचो. आम्ही बॉल पॅडवर मारायचा प्रयत्न करायचो. तसेच, आपण बेंगळुरूमध्ये एका सामन्यात द्रविडला एलबीडब्ल्यू बाद करण्यात यशस्वी झालो होतो. पण, अंपायरने त्याला बाद दिले नव्हते, असेही तो म्हणाला होता.
त्या सामन्याची आठवण सांगताना अख्तर म्हणाला, 'एकदा बेंगळुरूमध्ये अंतिम सामना सुरू होता. तेव्हा मी सदागोपन रमेशला लवकर बाद केले. आम्ही तीन-चार विकेट लवकर घेतल्या होत्या. त्या सामन्यात सचिन खेळत नव्हता. शाहिद आफ्रिदी मला म्हणाला, कुठलाही बॉल टाक आणि द्रविडला बाद कर, नाहीतर तो खूप वेळ खेळंल. अख्तर म्हणाला, 'मी सरळ त्याच्या पॅडवर बॉल फेकला आणि अंपायरकडे अपील केली. मी एवढेही म्हणालो की, आज शुक्रवार आहे. त्यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला नाही. पण शेवटी आम्ही सामना जिंकला.
Web Title: Not Sachin, Shoaib Akhtar used to be flustered in front of rahul dravid shoaib akhtar and rahul dravid rivalry india vs pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.