नवी दिल्ली : एमएसके प्रसाद यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. त्यांनी त्यांच्यावर (केवळ सहा कसोटी सामने खेळण्याचा अनुभव) होत असलेल्या टीकेला उत्तर दिले.
प्रश्न : निवड समितीच्या अनुभवाबाबत बरेच काही बोलले जात आहे.
उत्तर : निवड समितीमध्ये समावेश असलेल्या सर्व सदस्यांनी विविध प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आमच्या नियुक्तीच्या वेळी असलेले निकष आम्ही पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आम्ही ४७७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून २०० पेक्षा अधिक प्रथम श्रेणी सामने बघितले आहेत. हे आकडे बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाही की, एक खेळाडू व निवड समिती सदस्य म्हणून आम्ही योग्य कौशल्याची ओळख पटवण्यास सक्षम आहोत.
प्रश्न : तुम्ही एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यावर लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत.उत्तर : जर आमच्या क्षमतेवर व आंतरराष्ट्रीय अनुभवावर प्रश्न उपस्थित होत असतील तर इंग्लंड अॅण्ड बेल्स क्रिकेट बोर्डाचे निवड समिती अध्यक्ष अॅड स्मिथ यांनी केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे निवड समिती प्रमुख ट्रेव्होर होन्स यांनी केवळ सात कसोटी सामने खेळले आहेत. १२८ कसोटी आणि २४४ वन-डे सामने खेळणारा मार्क वॉ त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. दिग्गज ग्रेग चॅपेल यांना ८७ कसोटी व ७४ वन-डे सामन्यांचा अनुभव आहे आणि ते ट्रॅव्हर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहेत.जर त्यांच्या देशांमध्ये क्षमता व आंतरराष्ट्रीय अनुभवाचा मुद्दा नाही तर आपल्या देशात तो कसा असू शकतो? माझ्या मते, प्रत्येक कार्यासाठी वेगळ्या क्षमतेची गरज असते, असे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जर आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा असता तर आपले लाडके राजसिंग डुंगरपूर कधीच निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकले नसते. कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नव्हते. अशास्थितीत कदाचित सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकला नसता.आंतरराष्ट्रीय अनुभवाची चर्चा केली तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळणारे खेळाडू निवड समिती सदस्य होण्याबाबत विचार करणार नाहीत. अशास्थितीत निवड समितीची क्षमता व आंतरराष्ट्रीय अनुभवावर वक्तव्य करणे कुठे तर्कसंगत आहे. या कामामध्ये प्रतिभा दाखविण्यासाठी वेगळ्या वैशिष्ट्याची गरज आहे.
प्रश्न : जेव्हा तुम्हाला ‘कमकुवत’ म्हटले जाते, त्याचा राग येतो का?उत्तर : हे दुर्दैवी आहे. आम्ही दिग्गज खेळाडूंचा आदर करतो. त्यांच्या मताचा सकारात्मक विचार केला जातो. त्यांच्याकडे त्यांचा दृष्टिकोन आहे. वास्तविकतेमध्ये अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे दु:खी होण्यापेक्षा आम्ही अधिक मजबूत, प्रतिबद्ध व एकजूट होतो.
प्रश्न : निवड समितीच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळाचे आकलन तुम्ही कसे कराल?उत्तर : आमच्या समितीने स्थानिक क्रिकेटमधील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी पूर्ण देशाचा दौरा केला आहे. आम्ही क्षमतेनुसार योग्य खेळाडूंना भारत ‘अ’ आणि सिनियर संघांमध्ये स्थान दिले आहे.जे खेळाडू जास्त खेळले त्यांना जास्त ज्ञान आहे किंवा शक्ती आहे. ते कुणावरही वर्चस्व गाजवू शकतात, असे समजणे चुकीचे आहे. जर असे असते तर कोचिंग स्टाफ, निवड समिती व दुसऱ्या प्रमुख विभागांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या लोकांची वर्णी लागली असती. त्यामुळे हे योग्य आहे, असे मला वाटत नाही.1आमच्या कसोटी संघाने १३ कसोटी मालिकांपैकी ११ मालिका जिंकल्या आहेत. आम्ही गेल्या तीन वर्षांत आयसीसीमध्ये नंबर वन कसोटी संघ आहोत.2वन-डे क्रिकेटमध्ये ८०-८५ टक्के यश मिळविले आहे. विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत होण्यापूर्वी आपण मानांकनामध्ये अव्वलस्थानी होतो. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरी गाठली. आम्ही दोनदा आशिया कप (२०१६, २०१८) पटकावला.3भारत ‘अ’ संघ ११ मालिकांमध्ये सहभागी झाला आणि सर्वच मालिका जिंकल्या. त्यात चार मालिका चौरंगी होत्या. भारत ‘अ’ने ९ पैकी ८ कसोटी मालिकांमध्ये विजय नोंदवला.4आम्ही जवळजवळ ३५ नव्या खेळाडूंना तयार केले आणि त्यांना तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघात संधी दिली. आम्ही खेळाच्या सर्वच विभागात पुरशी बेंच स्ट्रेंथ निर्माण केली. आमच्या पुढील समितीसाठी उत्कृष्ट खेळाडूंची यादी तयार आहे.