शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तयारीला फ्रँचायझी लागल्या आहेत. १२ डिसेंबरला ट्रेड विंडो बंद होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:07 PM2023-11-30T12:07:05+5:302023-11-30T12:07:54+5:30

whatsapp join usJoin us
Not Shubman Gill, AB De Villiers wanted this player to captain Gujarat Titans after Hardik Pandya's departure | शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तयारीला फ्रँचायझी लागल्या आहेत. १२ डिसेंबरला ट्रेड विंडो बंद होणार आहे आणि यात हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. गुजरात टायटन्सला पहिल्याच पर्वात जेतेपद आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद पटकावून दिल्यानंतरही हार्दिकचा संघ सोडण्याचा निर्णय आश्चर्य करणारा ठरला. गुजरात टायटन्सने मग हार्दिकच्या जागी शुबमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती जाहीर केली. पण, गिलला कर्णधार बनवून गुजरातने चूक केली, असे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू एबी डिव्हिलियर्सचे मत आहे. 


हार्दिकनंतर केन विल्यमसनला कर्णधार बनवता आले असते, असे मत एबीने व्यक्त केले. गुजरातकडे कर्णधारपदासाठी केन विल्यमसनसारखा अनुभवी खेळाडू होता, असे माजी खेळाडूचे मत आहे. भारतीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी गिलला आणखी थोडा वेळ द्यायला हवा होता, असेही एबी म्हणाला. 


डिव्हिलियर्सने यूट्यूब चॅनलवर सांगितले की, जेव्हा मी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विल्यमसनचे नाव पाहिले तेव्हा मला वाटले की अनुभवी खेळाडूला कर्णधारपद देण्याची ही उत्तम संधी आहे. विल्यमसनने यापूर्वीही कर्णधारपद भूषवले आहे. भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आणि आयपीएलमध्ये आणखी एक चांगला हंगाम खेळण्यासाठी गिलला गुजरातने वेळ द्यायला पाहिजे. 


गिलने आयपीएलच्या मागील मोसमात सर्वाधिक ८९० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ३ शतकांचाही समावेश होता. गुजरातला अंतिम फेरीत नेण्यात त्याचा मोठा वाटा होता. गिलला कर्णधार बनवण्याचा निर्णयाचा गुजरात टायटन्सना त्रास सहन करावा लागू शकतो, असे एबी म्हणाला. 

 

गुजरात टायटन्सने कायम राखलेले खेळाडू -डेव्हडि मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, अभिमन मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवातिया, मोहम्मद शणी, नूर अहमद, साई किशोर, राशीद खान, जोशूआ लिटल, मोहित शर्मा

गुजरात टायटन्सने रिलीज केलेले खेळाडू - यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडीन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका. 

Web Title: Not Shubman Gill, AB De Villiers wanted this player to captain Gujarat Titans after Hardik Pandya's departure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.