ना स्मृती मानधना, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:53 PM2024-03-13T18:53:52+5:302024-03-13T18:56:48+5:30

whatsapp join usJoin us
Not Smriti Mandhana or Ellyse Perry but Mumbai Indians captain Harmanpreet Kaur is Virender Sehwag's favorite player  | ना स्मृती मानधना, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन

ना स्मृती मानधना, ना एलिसे पेरी! सेहवाग मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचा जबरा फॅन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग नेहमी चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पोस्टमुळे तर कधी विधानामुळे वीरू प्रसिद्धीच्या झोतात येतो. सध्या भारतात महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरात यंदाच्या हंगामाचे सामने खेळवले जात आहेत. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर राहणारा संघ थेट अंतिम फेरीत खेळेल. 

माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागला त्याच्या आवडत्या महिला खेळाडूबद्दल विचारले असता त्याने मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव घेतले. यावेळी त्याने आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू एलिसे पेरीचे नाव घेणे टाळले. स्मृती आणि हरमन दोघीही यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 

वीरू हरमनचा जबरा फॅन
वृत्तसंस्था न्यूज 18 वरील एका कार्यक्रमात आवडत्या महिला खेळाडूबद्दल विचारले असता वीरूने म्हटले की, माझी आवडती खेळाडू नेहमीच हरमनप्रीत कौर राहिली आहे. तिची फलंदाजी पाहताना खूप मजा येते. कारण की, ती माझ्यासारखीच षटकार मारते आणि स्फोटक खेळी करते. 

मुंबईला नमवून RCB प्लेऑफमध्ये
मंगळवारी झालेला सामना आरसीबीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नमवून आरसीबीने प्लेऑफचे तिकीट मिळवले. ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरीने बळींचा षटकार लगावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिने ४ षटकांत अवघ्या १५ धावा देत ६ बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे WPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबईचा संघ सर्वबाद झाला. मुंबईला १९ षटकांत सर्वबाद केवळ ११३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५ षटकांत ३ बाद ११५ धावा करून विजय साकारला. 

Web Title: Not Smriti Mandhana or Ellyse Perry but Mumbai Indians captain Harmanpreet Kaur is Virender Sehwag's favorite player 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.