प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो (IndiGo Airlines) संदर्भात तक्रार करून प्रवाशांच्या असुविधेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यात आता आर अश्विन याने उडी घेतली आहे. त्यानेही आपल्या पोस्टसह इंडिगो कंपनीची फिरकी घेतल्याचे दिसते. भारताच्या अनुभवी फिरकीपटूनं आपला अनुभव शेअर करत विमान सेवा देणाऱ्या कंपनीच्या असुविधेचा पाढा वाचून दाखवलाय.
अश्विननं केला मोठा दावा बऱ्याचदा विमान प्रवास करताना असं घडतं. तुम्ही सीट ब्लॉक करूनही त्याचा लाभ तुम्हाला घेता येत नाही, असा दावा अश्विनने केला आहे. कारण व्यवस्थापन त्यानंतरही ती सीट अन्य व्यक्तीला देण्याचा निर्णय घेऊ शकते. ही एक नियमित भेडसावणारी समस्या आहे. संबंधित पोस्ट शेअऱ करताना त्याने आपल्या ट्विटमध्ये IndiGo6E लाही मेन्शन केलं आहे. तिराहित प्लॅटफॉर्मवरून सीट ब्लॉकसाठी पैसे घेतले जातात. पण त्यांना जे करायचं तेच ते करतात, असा उल्लेखही भारताच्या स्टार क्रिकेटरनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
हा एक घोटाळा तर नाही ना? संतप्त अश्विननं उपस्थिती केला मोठा प्रश्न
अश्विनने एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केलीये. त्यात त्याने लिहिलंय की, "माहित नाही हा घोटळा आहे की नाही". असेल तर ते समोर कोण आणणार?. या परिस्थितीत आपण फक्त एवढेच करू शकतो की, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. जरी तुम्ही पैसे देऊन सीट ब्लॉक केली असली तरी ते तुम्हाला देणार नाहीत. तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका." अशा शब्दांत अश्विननं आपला संताप व्यक्त केला आहे.
काय होती हर्षा भोगले यांची पोस्ट?
#IndigoFirstPassengerLast या हॅशटॅगसह हर्षा भोगले यांनी प्रवासादरम्यान वयोवृद्ध दाम्पत्यासंदर्भात घडलेला प्रसंग सांगत विमान सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीची शाळा घेतली होती. वयोवृद्ध दाम्पत्याने पैसे देऊन चौथ्या रांगेतील सीट ब्लॉक केली होती. पण कोणतेही कारण न देता त्यांना १९ व्या सीटवर जाण्यास सांगण्यात आले. ज्यावेळी सह प्रवाशांनी यासंबधी आवाज उठवला त्यावेळी त्यांना ती सीट मिळाली, असे हर्षा भोगले यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले होते.
इंडिगो कंपनीनं व्यक्त केली होती दिलगिरीहर्षा भोगले यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर कंपनीचा रिप्लायही आला होता. कंपनीने म्हटले होते की, "मिस्टर भोगले जी चूक घडली ती आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आणि वेळ काढून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. प्रवाशांना असुविधा झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या क्रू मेंबर्संनी तात्काळ संबंधित प्रवाशांना त्यांची पूर्वीची सीट दिली. जेणेकरून ते आरामात प्रवास करू शकतील."