भारतीय संघातील निवडीबाबत विचार करत नाही : रिंकू

रिंकूने शनिवारी लखनौविरुद्ध कोलकाताच्या पराभवानंतर सांगितले की, माझ्या कामगिरीमुळे हे सत्र माझ्यासाठी समाधानकारक ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:29 AM2023-05-22T05:29:31+5:302023-05-22T05:29:45+5:30

whatsapp join usJoin us
Not thinking about selection in Indian team: Rinku | भारतीय संघातील निवडीबाबत विचार करत नाही : रिंकू

भारतीय संघातील निवडीबाबत विचार करत नाही : रिंकू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या आयपीएलमधील निराशाजनक मोहिमेत शानदार कामगिरी करूनही युवा फलंदाज रिंकू सिंग याचे पाय जमिनीवर आहेत. सध्या भारतीय संघात निवडीबाबत विचार करत नाही, असे त्याने म्हटले आहे.  सध्याच्या आयपीएल सत्रात गुजरात टायटंस संघावर कोलकाताच्या विजयात पाच षटकार लगावून रिंकू प्रसिद्धीच्या झोतात आला होता. संघाचा मौल्यवान फलंदाज आणि फिनिशर म्हणून त्याची ओळख झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यास प्रबळ रिंकू प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. 

रिंकूने शनिवारी लखनौविरुद्ध कोलकाताच्या पराभवानंतर सांगितले की, माझ्या कामगिरीमुळे हे सत्र माझ्यासाठी समाधानकारक ठरले. मात्र, भारतीय संघात निवड होण्याबाबतचा विचार मी आताच करत नाही. २५ वर्षीय रिंकूने आयपीएलच्या सत्रात चौथे अर्धशतक लगावताना ३३ चेंडूंत नाबाद ६७ धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला रोमांचक विजयाची संधी निर्माण झाली होती. मात्र, कोलकाताचा संघ अवघ्या एका धावेने पराभूत झाला. कोलकातासाठी रिंकूने ५९.२५ च्या सरासरीने आणि १४९ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. 

दडपणात शांत राहिल्यानेच यश 
रिंकू म्हणाला की, गुजरात विरुद्ध अखेरच्या षटकात पाच षटकारांची गरज असताना मी निश्चिंत होतो. सलग पाच षटकार लगावण्याचा विचार माझ्या मनात आला होता. फक्त एका चेंडूवर चौकार गेला.

Web Title: Not thinking about selection in Indian team: Rinku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.