आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार

आज भारतीय फलंदाज विराट कोहलीचा ३४ वा जन्मदिन. आज त्याने त्याचा वाढदिवस भारतीय माध्यमांसोबत मेलबर्न येथील क्रिकेट ग्राऊंडवर साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 06:49 PM2022-11-05T18:49:43+5:302022-11-05T18:53:11+5:30

whatsapp join usJoin us
Not today, there's a big cake cut on Melbourne on the 13th Virat Kohli's determination to win the World Cup | आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार

आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आज भारतीय फलंदाज विराट कोहलीचा ३४ वा जन्मदिन. आज त्याने त्याचा वाढदिवस भारतीय माध्यमांसोबत मेलबर्न येथील क्रिकेट ग्राऊंडवर साजरा केला. यावेळी त्याने १३ नोव्हेंबर रोजी टी 20 वर्ल्ड कप जिंकून मोठा वाढदिवस साजरा कायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. आज विराट मोठ्या आत्मविश्वासात असल्याचे पाहायला मिळाले. 

T20 World Cup, ENG vs SL : ... तर टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडला भिडणार; जाणून घ्या केव्हा, कुठे व कधी सामना होणार

वाढदिवस साजरा करुन बाहेर पडताना त्याने सर्वाच्या शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी त्याने पत्रकारांशीही संवाद साधला.  एका पत्रकाराने त्याला विचारले, “विराट, तू कधी तुझा वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी साजरा केला आहेस का?” यावर कोहली हसला आणि म्हणाला, “तुम्ही मला याआधी कधी वाढदिवसाचा केकही पाठवला नाही.” "मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही." कोहली हसला आणि म्हणाला, "MCG मध्ये केक कापणे चांगले आहे पण मला केक कापायला आवडले असते." तो कोणता केक आहे हे तुम्हाला समजले असेल. पुढच्या रविवारी T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर  केक कापायला आवडेल असं कोहली म्हणाला.

... तर टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडला भिडणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही संघाला जेतेपद कायम राखता आले नाही आणि यजमानांनाही बाजी मारता आलेली. तेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घडले. इंग्लंडने ४ विकेट्सने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप झाले. इंग्लंड आयसीसी स्पर्धांमध्ये सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आता उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे आणि रोहित अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.

पथूम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार सुरुवात केली. यंदाच्या स्पर्धेत सर्वात वेगवान मारा करणाऱ्या मार्क वूडला या दोघांनी चोपून काढले.  चौथ्या षटकात ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात मेंडिस ( १८) झेलबाद झाला. निसंका काही थांबता थांबेना आणि त्याने सॅम कुरनच्या पुढील षटकात चौकार-षटकार खेचले. निसंका ४५ चेंडूंत २ चौकार व  ५ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. निसंकाच्या विकेटनंतर इंग्लंडने कमबॅक केले आणि श्रीलंकेला धक्के दिले. श्रीलंकेला ८ बाद १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मार्क वूडने ३ विकेट्स घेतल्या. 

 

Web Title: Not today, there's a big cake cut on Melbourne on the 13th Virat Kohli's determination to win the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.