Join us  

 "फक्त १५० किमी प्रति ताशी वेगाने काही होत नाही", शास्त्रींनी उमरान मलिकचे टोचले कान

ravi shastri on umran malik : आयपीएल २०२३ मध्ये अनेक असे शिलेदार आहेत, ज्यांना खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 1:52 PM

Open in App

umran malik ipl 2023 । नवी दिल्लीआयपीएल २०२३ मध्ये अनेक असे शिलेदार आहेत, ज्यांना खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. यातील एक नाव म्हणजे जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक. वेगाचा बादशाह उमरान सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मलिकच्या खराब खेळीचा दाखला देत त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. कुठे चूक करत आहे ते त्याला समजायला हवे असे शास्त्रींनी म्हटले.

वेग असून सर्वकाही होत नाही - शास्त्रीदीपक हुडा आणि उमरान मलिक यांच्याबद्दल बोलताना शास्त्रींनी म्हटले, "या खेळाडूंना शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे. उमरानबद्दल भाष्य करायचे झाले तर, फक्त वेग असून काहीही होत नाही. त्याला हे सांगण्याची गरज आहे की, १५० प्रति ताशी वेगाने जाणारा चेंडू बॅटमधून २०० प्रति ताशी वेगाने पुढे जात असतो." ते ESPNCricinfo शी बोलत होते. 

मुंबईच्या संघात मोठा बदल! जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर; घातक गोलंदाजाला मिळाली संधी

तर हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना भारताचा माजी खेळाडू आरपी सिंगने सांगितले की, उमरान मलिकने त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्याने नवीन चेंडूला स्विंग करण्याची कला शिकली तर त्याच्या गोलंदाजी करताना अनेक पर्याय मिळतील. अशाने तो आणखी घातक गोलंदाज होऊ शकतो.

तसेच एक गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमच्या कर्णधाराला पटवून द्यावे लागेल की तुम्ही संघासाठी सामन्यात योगदान देऊ शकता. त्याच्याकडे (उमरान) वेग आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. जर तो डेल स्टेनसारखा चेंडू स्विंग करू शकला तर तो आणखी घातक गोलंदाज ठरू शकतो पण उमरानकडे चेंडू स्विंग करण्याची कलाच नाही, असे आरपी सिंगने अधिक सांगितले. 

"धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट

  

टॅग्स :आयपीएल २०२३रवी शास्त्रीसनरायझर्स हैदराबादभारतीय क्रिकेट संघ
Open in App