...आता सर्व फलंदाजांवर अवलंबून

वाँडरर्स येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीचा अहवाल सामनाधिकारी काय देतात, याबाबत उत्सुकता आहे. कुठलीही एकतर्फी खेळपट्टी चांगली खेळपट्टी नसते. वाँडरर्सची खेळपट्टी केवळ गोलंदाजांसाठी अनुकूल असून येथे जगातील सर्वोत्तम फलंदाजही चाचपडत असल्याचे चित्र आहे. काही उसळी घेणा-या खेळपट्ट्यांवर जसा जीविताला धोका असतो, सुदैवाने तशी स्थिती येथे नाही, पण असमतोल उसळी असलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजांना मात्र शरीरावर चेंडूचे वार झेलावे लागत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:39 AM2018-01-26T00:39:06+5:302018-01-26T00:40:24+5:30

whatsapp join usJoin us
 ... now all depends on the batsmen | ...आता सर्व फलंदाजांवर अवलंबून

...आता सर्व फलंदाजांवर अवलंबून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सुनील गावसकर लिहितात...
वाँडरर्स येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीचा अहवाल सामनाधिकारी काय देतात, याबाबत उत्सुकता आहे. कुठलीही एकतर्फी खेळपट्टी चांगली खेळपट्टी नसते. वाँडरर्सची खेळपट्टी केवळ गोलंदाजांसाठी अनुकूल असून येथे जगातील सर्वोत्तम फलंदाजही चाचपडत असल्याचे चित्र आहे. काही उसळी घेणा-या खेळपट्ट्यांवर जसा जीविताला धोका असतो, सुदैवाने तशी स्थिती येथे नाही, पण असमतोल उसळी असलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजांना मात्र शरीरावर चेंडूचे वार झेलावे लागत आहे.
सामन्याची वाटचाल जशी पुढे जाईल तसे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आणखी कठीण होईल. खेळपट्टीच्या भेगा रुंदावल्यानंतर चेंडू अचानक उसळी घेईल आणि दिशाही बदलेल. भारतीय संघासाठी जे काम पुजाराने केले ते काम दक्षिण आफ्रिकेसाठी हाशिम अमलाने केले. त्याने शरीरावर चेंडूचे आघातही स्वीकारले, पण खेळपट्टीवर कायम राहण्याच्या भूमिकेवर ठाम राहिला.
भुवनेश्वर कुमारने फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. त्याला दुस-या कसोटी सामन्यातून वगळणे चूक ठरले. स्विंग व सिम गोलंदाजासाठी अनुकूल खेळपट्टीची गरज नसते. त्याने पुन्हा एकदा अचूक दिशा व टप्पा राखत गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताच्या दुर्दैवाने मोहम्मद शमीला केपटाऊनची लय कायम राखता आली नाही. त्यामुळे कोहलीला तीन वेगवान गोलंदाजांकडून अतिरिक्त गोलंदाजी करून घ्यावी लागली. धावफलकावर छोटी धावसंख्या असल्यामुळे कोहलीने हार्दिक पंड्याला अधिक गोलंदाजी देण्याचा जोखीम पत्करली नाही. त्यामुळे भुवनेश्वर, ईशांत व बुमराह यांना अधिक मारा करावा लागला. त्यांनी मिळालेल्या संधीचा लाभ घेत चांगला मारा केला.
भारतीय फलंदाजांना दुसºया डावात चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी प्रसंगी काही चेंडू शरीरावर खावेही लागतील. भुवनेश्वर अँड कंपनीला कसोटी सामना जिंकून देण्याची संधी देण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा उभारण्याची जबाबदारी आता सर्वस्वी फलंदाजांवर आहे. (पीएमजी)

Web Title:  ... now all depends on the batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.