ठळक मुद्देमहिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील लढतीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 11 नोव्हेंबरला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला होता. या सामन्यात भारताने 34 धावांची विजय मिळवला होता. भारताच्या हरमनप्रीत कौरने 51 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 103 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती.
नवी दिल्ली : चाहत्यांना आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार काही तासांमध्ये अनुभवायला मिळणार आहे. कारण महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील लढतीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 11 नोव्हेंबरला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
या विश्वचषकात भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला होता. या सामन्यात भारताने 34 धावांची विजय मिळवला होता. भारताच्या हरमनप्रीत कौरने 51 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 103 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत पुन्हा एकदा मोठी खेळी साकारणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्याचबरोबर भारताची जेमिमा रॉड्रीग्स ही युवा खेळाडूही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: Now the fever of the India-Pakistan game to be restored again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.