नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केले आणि त्यामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या. पण आता या शनिवारी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 19-वर्षांखालील क्रिकेटचा सामना येत्या शनिवारी श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये सध्या आशिया चषकाचे आयोजन करण्या आले आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 सप्टेंबरला कुवेतच्या संघाबरोबर होणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. हा सामना सकाळी 9.30 वाजता होणार आहे. त्यानंतर 9 सप्टेंबरला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. 12 सप्टेंबरला या स्पर्धेची उपांत्य फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.