नवी दिल्ली : इंग्लंडने बरोबर एक वर्षापूर्वी न्यूझीलंडला अंतिम सामन्यात नाट्यमयरीत्या हरवून पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला होता. त्या सामन्यातील रोमांचक स्मृतींना उजाळा देत विजेत्या संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन याने एका क्षणाला सामना हरलो असे वाटल्याचे म्हटले.दोन्ही संघांनी समान धावा केल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले. एका क्रिकेट संकेतस्थळाला मॉर्गन म्हणाला की, ‘त्यावेळी एकाक्षणी मला विजयाबद्दल शंका वाटली. जिमी निशामचा चेंडू स्टोक्सने हवेत मारला. स्टोक्स झेलबाद झाला, तर जिंकू शकत नाही, असे एकवेळ वाटले होते. एकदिवसीय व टी२० विश्वविजेता संघ बनण्याच्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे. पुढील दोन्ही टी२० विश्वचषक अनुक्रमे आॅस्ट्रेलिया व भारतात होणार असल्याने या जेतेपदाला महत्त्व प्राप्त होईल.’सुपरओव्हरआधी स्टोक्सने घेतला होता ‘सिगारेट ब्रेक’लॉर्ड्स मैदानावर आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी इंग्लंडने एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपरओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर जेतेपद बहाल करण्यात आले. बेन स्टोक्सने या सामन्यात बहारदार खेळी करताना इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्टोक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने हातातून निसटत चाललेला सामना बरोबरीत सोडवला. अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू चांगलेच तणावाखाली होते. साहजिकच स्टोक्सवरही हा तणाव होता. मोक्याच्या प्रसंगी स्वत:ला शांत करण्यासाठी स्टोक्सने सुपरओव्हरमध्ये सिगारेट ब्रेक घेतला होता, असा गौप्यस्फोट निक हॉल्ट आणि स्टीव्ह जेम्सद्वारा लिखित‘मॉर्गन मेन : द इन्साईड स्टोरी आॅफ इंग्लंड राईज आॅफ क्रिकेट वर्ल्डकप ह्युमिलिएशन टू ग्लोरी’या पुस्तकात करण्यात आला आहे. ‘मैदानात २७ हजारांच्या घरात प्रेक्षक, टीव्ही कॅमेरे आणि सुपरओव्हरमुळे निर्माण झालेली उत्सुकता,’ या सर्व परिस्थितीत लॉडर््स मैदानावर एकांत मिळेल अशी जागा मिळणे कठीण होते. स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळला होता. या मैदानातला प्रत्येक कोपरा त्याला माहीत होता. कर्णधार इयॉन मॉर्गन संघाला शांत करून नवीन डावपेच आखण्यात व्यस्त असताना स्टोक्सने संघापासून वेगळे राहणे पसंत केले. तो घामाने भिजला होता. दोन तास २७ मिनिटे फलंदाजी केल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममागे वॉशरूममध्ये जात एक सिगारेट ओढली आणि स्वत:ला सज्ज केले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आता हरलो असे एकाक्षणी वाटले होते- इयोन मॉर्गन; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील थराराला दिला उजाळा
आता हरलो असे एकाक्षणी वाटले होते- इयोन मॉर्गन; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील थराराला दिला उजाळा
दोन्ही संघांनी समान धावा केल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:09 AM