नवी दिल्ली : भारतीय संघाला इंग्लंडच्या दौऱ्यात पहिले दोन्ही सामने गमवावे लागले आहेत. भारतीय संघावर माजी क्रिकेटपटू टीका करत आहे. यामध्येच पाकिस्तानच्या संघानेही आपले हात साफ करून घ्यायचे ठरवले आहे. त्यामुळे पाकिस्ताननेइंग्लंडमध्ये क्रिकेट कसं खेळायचं, याचे धडे भारतीय संघाला दिले आहेत. पण भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, हे त्यांना माहिती नसावे. त्यामुळे आता पाकिस्तान भारताला अक्कल शिकवणार का, अशी भावना क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहेत.
पाकिस्तानच्या संघाने 2016 साली इंग्लंडा दौरा केला होता. यावेळी त्यांनी कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानने दोन सराव सामनेही खेळले होते. त्यामुळे आपण मालिका अनीर्णीत राखल्यावर भारताला त्यांनी खडे बोल सुनवायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद यावेळी म्हणाला की, " इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तुम्ही चांगला सराव करणे गरजेचे असते. त्याचबरोबर इंग्लंडच्या वातावरणाशी जुळवून घेणे, तिथे जास्तीत जास्त सराव सामने खेळणे महत्त्वाच ठरते. त्यामुळेच इंग्लंडच्या दौऱ्यात आम्हाला कधीही मानहानीकारक पराभव पत्करावा लागला नाही. पण सध्या भारतावर ती वेळ आली आहे."