आता चुकीला माफी नाही; BCCIच्या वादामुळे विराट आणि रोहितवर दबाव

टीम इंडियाकडे आता 2 कर्णधार आहेत. रोहित शर्माकडे वनडे आणि टी-20 संघांचे नेतृत्व आहे, तर विराट कोहलीकडे कसोटीचे. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या दोघांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:48 PM2021-12-19T12:48:27+5:302021-12-19T12:48:37+5:30

whatsapp join usJoin us
Now there is no excuse for bad performance; Pressure on Virat kohli and Rohit Sharma due to BCCI dispute | आता चुकीला माफी नाही; BCCIच्या वादामुळे विराट आणि रोहितवर दबाव

आता चुकीला माफी नाही; BCCIच्या वादामुळे विराट आणि रोहितवर दबाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आले आहे. मात्र यादरम्यान कोहली आणि बीसीसीआय आमनेसामने आले आहेत. कोहली आणि गांगुलीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन वाद चव्हाट्यावर आणला. आता या वादाने सगळ्यांवरच दबाव वाढला आहे.

कोहलीला गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावरही अपयशी ठरल्यावर तो बोर्डाच्या नजरेखाली येईल. दुसरीकडे, रोहित शर्माला ज्या प्रकारे वनडे संघाचे कर्णधारपद मिळाले आहे, त्यामुळे त्याच्यावरही नेहमीच विजयाचे दडपण असेल. म्हणजेच एकंदरीत कोहली आणि रोहितची अडचण कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे.

5 आयपीएल जेतेपदांनी अपेक्षा वाढवल्या

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पूर्णवेळ कर्णधार होण्यापूर्वी, रोहितने टीम इंडियात 19 टी-20 आणि 10 एकदिवसीय सामने खेळले. कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत (भारत विरुद्ध न्यूझीलंड) त्याने संघाला T-20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवून दिला. मात्र, कोहलीपेक्षा एक वर्षाने मोठ्या असलेल्या रोहितच्या फिटनेसने बोर्डाची चिंता वाढवली आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

2 वर्षात 2 विश्वचषक

रोहित शर्मा येत्या दोन वर्षांत दोन विश्वचषकांमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 होणार आहे. त्यानंतर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक मायदेशात होणार असल्याने कोहलीला या कारणासाठी वनडेचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. पण, कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. तर, आता कर्णधार म्हणून सर्वांच्या पसंतीला उतरण्यासाठी रोहितलाही चांगल्या कामगिरीसह संघाला विजय मिळवून द्यावा लागेल.

टी-20 विश्वचषकापूर्वी बैठक झाली

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहली आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बोर्डाच्या एका आतल्या व्यक्तीने सांगितले की, बैठकीत सौरव गांगुलीने कोहलीला T-20 कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले होते. त्यावेळी निवड समितीचे सदस्यही उपस्थित होते. गांगुलीने कोहलीला त्याचे फायदे आणि तोटेही सांगितले होते. पण बोर्ड याबाबत काही बोलण्यापूर्वीच कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. अचानक असा निर्णय घेऊन कोहलीने बोर्डाला आव्हान दिले. त्यानंतर बोर्डानेही त्याला कर्णधारपदावरुन हटवून आपली ताकत दाखवून दिली.

Web Title: Now there is no excuse for bad performance; Pressure on Virat kohli and Rohit Sharma due to BCCI dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.