T20 World Cup, IND vs BAN : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी बांगलादेशवर थरारक विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं. पण, या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli) चिटींग केल्याचा आरोप होतोय. विराटने Fake Fielding केल्याचा ट्रेंड सुरू असताना बांगलादेशचा यष्टीरक्षक- फलंदाज नुरूल हसनने ( Nurul Hasan) बोचरी टीका केली. भारताने DLS नियमानुसार ५ धावांनी विजय मिलवला आणि बांगलादेशला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर केले. या सामन्यात मैदानावरील अम्पायरने भारताच्या माजी कर्णधार विराटच्या Fake Fielding कडे लक्ष दिले नसल्याचेही नुरूल म्हणाला.
'या परिस्थितीला नरेंद्र मोदीच जबाबदार'; पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
हा निर्णय का महत्त्वाचा ठरला असता?पावसाचा व्यत्यय आल्यामुळे बांगलादेशसमोर १६ षटकांत सुधारित १५१ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. पावसाचे आगमन झाले तेव्हा बांगलादेशने ७ षटकांत ६८ धावा केल्या होत्या आणि DLS नुसार ते १७ धावांनी पुढे होते. सुधारित लक्ष्य दिल्यानंतर त्यांना ५४ चेंडूंत ८५ धावा करायच्या होत्या. बांगलादेशने कडवी टक्कर दिले. लोकेश राहुलने अचून थ्रो करून लिटन दासला ( ६०) रन आऊट केले. त्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी विकेट फेकल्या, पण विराटची फेक फिल्डींग चर्चेत आली.
नेमका काय प्रसंग घडलाविराट कोहलीची फेक फिल्डिंग अम्पायरच्या निदर्शनास आली नाही. बांगलादेशच्या डावातील ७व्या षटकात हा प्रकार घडला. अर्शदीप सिंगने सीमारेषेवरून चेंडू थ्रो केला आणि तो थेट दिनेश कार्तिककडे आला. पण, या दोघांच्या मध्ये उभ्या असलेल्या विराटने चेंडू त्याच्याकडे आल्याचा आभास निर्माण करून थ्रो केल्याची अॅक्टिंग केली. विराटची ही कृती अम्पायरच्या निदर्शनास आली नाही. बांगलादेशचे फलंदाज लिटन दास व नजमुल शांतो यांनीही त्यावर आक्षेप घेतला नाही. नियम काय सांगतो?४१.५ नियमानुसार फलंदाजाचे लक्ष मुद्दाम विचलित करणे, फसवणे किंवा अडथळा आणणे, ही कृती अनफेअर मानली जाते. अशात नियमांचे उल्लंघन झाल्यात अम्पायर तो चेंडू डेड बॉल ठरवून फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा देऊ शकतात.
नुरूल काय म्हणाला? नुरूलच्या मते अम्पायरने विराटची ती कृती पाहिली, परंतु त्यावर काहीच कारवाई केली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"