सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट संघानं नियोजित पाकिस्तान दौरा रद्द केला. आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी न्यूझीलंड सरकारच्या गुप्तचर विभागाला संघावर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती मिळाली. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ( NZC) हा दौरा रद्द झाल्याची घोषणा केली. न्यूझीलंडचे खेळाडू हॉटेलमध्येच थांबले होते आणि आता ते तिथूनच मायदेशासाठी रवाना होणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांनी यासंदर्भात न्यूझीलंड सरकारची चर्चा केली अन् सुरक्षिततेची हमी दिली. पण, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं त्यांचा प्रस्ताव फेटाळून माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक मालिका न्यूझीलंडनं केली रद्द; दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय
न्यूझीलंड सरकारला गुप्तचर विभागाकडून हल्ला होण्याची माहिती मिळताच त्यांनी ती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला कळवली आणि हा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू आजच रावळपिंडी येथून मायदेशासाठी रवाना होणार आहेत. ( New Zealand cancels cricket series with Pakistan amidst major security threat. NZ Intelligence agencies received information about an imminent terror attack on the team after which the NZ Govt decided to rush back players home. NZ team will leave Rawalpindi today)