NZ vs AUS, 4th T20I : आयपीएल लिलावात ( IPL 2021 Auction) न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं १५ कोटी मोजले, त्यापासून तो चर्चेत राहिला आहे. त्याच्यासाठी एवढी रक्कम मोजूनही त्याची कामगिरी अत्यंत निराशाजन झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराट कोहली ( Virat Kohli) आणि RCB सातत्यानं ट्रोल होत आहे. त्यात RCBनं IPL 2021च्या तोंडावर रिलीज केलेल्या अॅरोन फिंचनं ( Aaron Finch) सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावून ट्रोलर्सना आणखी एक संधी दिली. फिंचनं न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्याच्या अखेरच्या षटकात जेमिन्सनला चार खणखणीत षटकार खेचून २६ धावा चोपल्या. IPL 2021 Dates : टीम इंडिया जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात खेळल्यास BCCIला घ्यावा लागेल मोठा निर्णय
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं ६ बाद १५६ धावा केल्या. फिंचनं एकहाती खिंड लढवताना ५५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानं टोलावलेली चारही षटकार हे अखेरच्या षटकात आली. जेमिन्सननं ४ षटकांत ४९ धावा दिल्या आणि पुन्हा एकदा तो विकेट घेण्यात अपयशी ठरला.
कायले जेमिन्सनची मागील तीन ट्वेंटी-20तील कामगिरी१ बाद ३२ धावा४ षटकांत ५६ धावा४ षटकांत ३८ धावा व ११ धावा
ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-20त १०० षटकार मारणारा पहिला फलंदाजअॅरोन फिंच ७० डाव व १०३ षटकारग्लेन मॅक्सवेल ६३ डाव ९३ षटकारडेव्हिड वॉर्नर ८१ डाव ९१ षटकार