New Zealand vs Australia, 3rd T20I : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावात सर्वाधिक भाव खाणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनं ( Glenn Maxwell) बुधवारी तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत तुफान फटकेबाजी केली. तेच आयपीएल लिलावात दुर्लक्षित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) माजी खेळाडू अॅरोन फिंचनंही ( Aaron Finch) आक्रमक खेळ करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं ४ बाद २०८ धावांचा डोंगर उभा केला. ११ दिवसांचा कसोटी सामना, १९८१ धावा, ६ शतकं अन् विजयासाठी ४२ धावांची गरज असताना खेळाडू ट्रेन पकडून परतले
मॅथ्यू वेड ( ५) लगेच माघारी परतल्यानंतर फिंच आणि जोश फिलीप यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. फिलीप २७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ४३ धावांवर माघारी परतला. खराब फॉर्मामुळे चर्चेत असलेल्या फिंचनं अर्धशतक पूर्ण करताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. फिंचनं ४४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकार खेचून ६९ धावांची खेळी केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलचं वादळ घोंगावलं. आयपीएल लिलावात RCBनं त्याच्यासाठी १४.२५ कोटी रुपये मोजले. मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून अपयशी ठरल्यानंतर मॅक्सवेलला रिलीज केलं आणि RCBनं त्याला आपल्या ताफ्यात करून घेतलं. 'पौछा मारू या झाडू?'; Jasprit Bumrahच्या लग्नाच्या चर्चांवर युवराज सिंगनं केलं ट्रोल
मॅक्सवेलनं जिमी निशॅमच्या एका षटकात 4,6,4,4,4,6 अशा २८ धावा चोपल्या. त्याची फटकेबाजी एवढी जोरदार होती की स्टेडियमवरील खूर्चीच तुटली. मॅक्सवेलनं ३१ चेंडूंत ८ चौकार व ५ खणखणीत षटकार खेचून ७० धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-20 सामन्यात एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मॅक्सवेलनं दुसरं स्थान पटकावलं. रिकी पाँटिंगनं २००५मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात ३० धावा चोपल्या होत्या. जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत
युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी२५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक अर्धशतक करण्याच्या युवराज सिंगच्या विक्रमाशी ग्लेन मॅक्सवेलनं बरोबरी केली. युवी, मॅक्सवेल, कॉलीन मुन्रो आणि एबी डिव्हिलियर्स यांनी चारवेळा अशी स्फोटक खेळी केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत मॅक्सवेल दुसऱ्या स्थानी आला. फिंच ( ९९ षटकार), मॅक्सवेल ( ९२) आणि डेव्हिड वॉर्नर ( ८९ ) असा क्रम येतो.