T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : ४,४,४,४,४,४,४,४,४,४,६,६,६; केन विलियम्सन भारी खेळला, ऑस्ट्रेलियाला एक'हाती' नडला! 

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : नाणेफेकीला कौल विरोधात जाऊनही न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचं मनोबल खचलं नाही. त्यानं एकहाती फटकेबाजी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील सर्वोत्तम धावसंख्या करण्याचा विक्रम संघाच्या नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:13 PM2021-11-14T21:13:40+5:302021-11-14T21:14:19+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs AUS Live Updates : Kane Williamson break many record, he smash 85 runs; New Zealand posts the highest total ( 172) in a men's T20 World Cup final | T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : ४,४,४,४,४,४,४,४,४,४,६,६,६; केन विलियम्सन भारी खेळला, ऑस्ट्रेलियाला एक'हाती' नडला! 

T20 World Cup Final, NZ vs AUS Live Updates : ४,४,४,४,४,४,४,४,४,४,६,६,६; केन विलियम्सन भारी खेळला, ऑस्ट्रेलियाला एक'हाती' नडला! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकण्याचं प्रमाण हे १०-१ असे आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूनं लागतो, याची साऱ्यांना उत्सुकता होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच याचे नशिब फळफळले अन् त्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करणे तितके सोपे नाही हे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला कळून चुकले होते. पण, तो खचला नाही, तर कॅप्टन्स इनिंग खेळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा एक'हाती' सामना केला. 

नाणेफेकीला कौल विरोधात जाऊनही न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचं मनोबल खचलं नाही. मार्टीन गुप्तील व डॅरील मिचेल यांनी काही सुरेख फटके मारून किवींना चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, जोश हेझलवूडनं किवींना पहिला धक्का दिला. मिचेल ( ११) बाद झाला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. न्यूझीलंडला पॉवरप्लेमध्ये १ बाद ३२ धावा करता आल्या. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवरप्लेमधील ही त्यांची सर्वात निचांक खेळी आहे. हेझलवूडनं ३ षटकांत ११ धावा देताना १ विकेट घेतली. विलियम्सनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण किवींना पहिल्या १० षटकांत ५७ धावाच करता आल्या.

केन व मार्टीन यांची जोडी डोईजड होईल असे चिन्ह दिसत असताना अ‍ॅडम झम्पानं ही जोडी तोडली. मार्टीन २८ धावांवर माघारी परतला अन् केनसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या विकेटनंतर केननं धावांची गती वाढवली, त्यानं ग्लेन मॅक्सवेलला दोन खणखणीत षटकात खेचून ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करणारा तो कुमार संगकारा ( २००९ वि. पाकिस्तान) याच्यानंतर दुसरा कर्णधार ठरला. केननं एक हातानं टोलावलेला षटकार पाहून यष्टिरक्षक मॅथ्यू वेडही अवाक् झाला. केनचा झंझावात इथेच थांबला नाही, तर त्यानं १६व्या षटकात मायकेल क्लार्कला २२ धावा कुटल्या. त्यात चार चौकार व एक षटकार खेचला. केननं ६४ धावांचा पल्ला ओलांडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. 


केन व ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि त्यापैकी ४६ धावा या केनच्याच होत्या. १८व्या षटकात हेझलवूडला स्कूप मारून केननं आणखी एक पराक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम त्याच्या नावावर झाला. त्यानं मार्लोन सॅम्युअल्सचा ८५* धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली. केननं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. वन डे वर्ल्ड कप फायनल, जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतकी+ धावा करणारा  केन हा जगातला पहिला कर्णधार ठरला. ( Kane Williamson becomes the first ever captain to score a 50 in ). झेलडवूडकडून मिळालेल्या जीवदानाचा केननं पुरेपूर फायदा उचलला. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. 

Web Title: NZ vs AUS Live Updates : Kane Williamson break many record, he smash 85 runs; New Zealand posts the highest total ( 172) in a men's T20 World Cup final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.