NZ vs BAN, 1st Test : बांगलादेशनं यजमान न्यूझीलंडला 'टफ फाईट' दिली; आशिया खंडाबाहेर प्रथमच भारी कामगिरी केली

NZ vs BAN, 1st Test : बांगलादेश संघानं पहिल्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडला कडवी टक्कर दिली आहे. डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याच्या शतकानंतरही न्यूझीलंडला पहिल्या डावात फक्त ३२८ धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 02:50 PM2022-01-02T14:50:38+5:302022-01-02T14:51:08+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs BAN, 1st Test : NZ 328 all out, This is the first time Bangladesh bowled out the opposition for under 350 total in a Test innings outside Asia, Zimbabwe or West Indies | NZ vs BAN, 1st Test : बांगलादेशनं यजमान न्यूझीलंडला 'टफ फाईट' दिली; आशिया खंडाबाहेर प्रथमच भारी कामगिरी केली

NZ vs BAN, 1st Test : बांगलादेशनं यजमान न्यूझीलंडला 'टफ फाईट' दिली; आशिया खंडाबाहेर प्रथमच भारी कामगिरी केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NZ vs BAN, 1st Test : बांगलादेश संघानं पहिल्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडला कडवी टक्कर दिली आहे. डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याच्या शतकानंतरही न्यूझीलंडला पहिल्या डावात फक्त ३२८ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १७५ धावा उभारल्या. बांगलादेशच्या महमुदूल हसन जॉय ( Mahmudul Hasan Joy ) व नजमूल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto ) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला. बांगलादेशचा संघ १५३ धावांनी पिछाडीवर आहे. पण, या सामन्यात त्यांनी नवा विक्रम नोंदवला. आशिया खंडाबाहेर त्यांनी प्रथमच एखाद्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये ३५० धावांच्या आत गुंडाळण्याचा पराक्रम केला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या Mount Maunganui येथे सुरू असलेल्या कसोटीत कॉनवेनं २२७ चेंडूंत १२२ धावा केल्या. यापैकी ७० धावा या केवळ ( १६ चौकार व १ षटकार) चौकार-षटकरांनीच जोडल्या. कर्णधार टॉम लॅथम ( १) चौथ्याच षटकात माघारी परतल्यानंतर विल यंग व कॉनवे यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. विल यंग १३५ चेंडूंत  ५२ धावांवर माघारी परतला.  कसोटी कारकीर्दितील अखेरची मालिका खेळणाऱ्या रॉस टेलरचे मैदानावर जंगी स्वागत झाले, परंतु त्याला ३१ धावाच करता आल्या. कॉनवेसोबत त्यानं अर्धशतकी भागीदारी केली. कॉनवे माघारी परतल्यानंतर किवींना आणखी एक धक्का बसला. टॉम ब्लंडल ( ११) माघारी परतल्यानं पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था ५ बाद २५८ अशी झाली होती.

दुसऱ्या दिवशी त्यांना धावसंख्येत ७६ धावांचीच भर घालता आली. त्यांचे पाच फलंदाज मिळून ७६ धावाच करू शकले. हेन्री निकोल्सनं ७४५ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या शोरीफुल इस्लाम व मेहिदी हसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोमिनूल हकने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा सलामीवीर शादमन इस्लाम ( २२) लगेच माघारी परतला. पण, हसन जॉय व शांतो यांनी १०४ धावांची भागीदारी केली. शांतो ६४ धावांवर माघारी परतला, तर जॉय ७० धावांवर नाबाद आहे. 


 

 

Web Title: NZ vs BAN, 1st Test : NZ 328 all out, This is the first time Bangladesh bowled out the opposition for under 350 total in a Test innings outside Asia, Zimbabwe or West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.