New Zealand vs Bangladesh , Ten Over Match : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्या पावसाचा व्यत्यय आला आणि १०-१० षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) व फिन अॅलन ( Finn Allen ) यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५.४ षटकांत ८५ धावांची भागीदारी केली. गुप्तील १९ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार खेचून ४४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अॅलननं वादळी खेळी केली. IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या अॅलनच्या या वादळी खेळीनं विराट कोहली नक्की खूश झाला असेल. गुप्तील बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सनं ६ चेंडूंत २ षटकारांसह १४ धावा केल्या. अॅलन यानं २९ चेंडूंत २४४.८३च्या स्ट्राईक रेटनं १० चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडननं दहा षटकांत ४ बाद १४१ धावा चोपल्या.
18 चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण ( Fastest T20I fifties for New Zealand (by balls)कॉलीन मुन्रो - १४ चेंडू वि. श्रीलंका, २०१६फिन एलन - १८ चेंडू वि. बांगलादेश, २०२१कॉलीन मुन्रो - १८ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१८कॉलीन मुन्रो - १८ चेंडू वि. इंग्लंड, २०१८
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) रिटेन खेळाडू : विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, फिन अॅलन
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख