मुंबई - एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, कायले जेमिसन यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला दोन्ही डावांत दोनशेच्या आता गुंडाळत न्यूझीलंडने दहा विकेट्सनी विजय मिळवला. दरम्यान, आज झालेल्या पराभवामुळे कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या विराटसेनेला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. वेलिंग्टन कसोटीत झालेला पराभव हा गतवर्षी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनचा भारताचा पहिलाच पराभव ठरला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आठ सामने खेळले असून, त्यातील सात सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर केवळ एक सामना गमवावा लागला आहे. दरम्यान, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वलस्थानी आहे. मात्र आज न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारताला ६० गुणांचे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे आज मिळवलेल्या विजयामुळे न्यूझीलंडला काहीसा दिलासा मिळाला आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा हा सहा सामन्यांमधील दुसरा विजय ठरला आहे. त्याबरोबरच आजच्या विजयामुळे मिळालेल्या ६० गुणांमुळे न्यूझीलंडच्या खात्यात एकूण १२० गुण जमा झाले आहेत.
संबंधित बातम्या
NZ vs IND, 1st Test : न्यूझीलंडसाठी हा विजय आहे खास; पटकावलं मानाच्या पंक्तीत स्थान!
NZ vs IND, 1st Test : पराभवानंतर विराट म्हणतो; नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, अन्...
NZ vs IND 1st Test: न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून विजय; मालिकेत आघाडीआता आजच्या पराभवामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वलस्थान भारतीय संघाला गमवावे लागेल.