न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघानं ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ असा सपाटून मार खाल्ल्यावर वनडे मालिकेतही त्यांची सुरुवात पराभवाने झाली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडच्या ताफ्यातील या तिघांनी केली पाक गोलंदाजांची धुलाई
मार्क चॅपमॅन (Mark Chapman) याची शतकी खेळी १३२ (१११), डॅरिल मिचेल(Daryl Mitchell) ८४ (७६) आणि मुहम्मज अब्बास (Muhammad Abbas) ५२ (२६) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित ५० षटकात ९ बाद ३४४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४४.१ षटकात २७१ धावांवर आटोपला. पहिल्या वनडेतील या पराभवासह गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर धावामुळे पाकिस्तान संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
NZ vs PAK : पाक वंशाच्या २१ वर्षीय पोराची कमाल; जलद अर्धशकासह मोडला पांड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
पाकिस्तानच्या संघावर पुन्हा ओढावली अवांतरच्या रुपात सर्वोच्च धावा खर्च करण्याची नामुष्की
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी बाय आणि लेग बायच्या रुपात ४३ अतिरिक्त धावा खर्च केल्या. वनडेत पाकिस्तानच्या संघानं सर्वोच्च अतिरिक्त धावासंख्या देण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पाकिस्तानच्या संघानं १९९९ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्यानंतर श्रीलंका (१९९०), न्यूझीलंड (२००३) यांच्याविरुद्धच्या वनडेत ४४ अतिरिक्त धावा खर्च केल्याचा रेकॉर्ड आहे.
वाइट नोच्या रुपात खर्च केल्या २३ धावा
पाकिस्तानच्या ताफ्यातील गोलंदाजांनी वाइड-नोच्या स्वरुपातही २३ धावा खर्च केल्या. यात अकिफ जावेद याने एका नो बॉलसह सर्वाधिक ७ वाइड बॉल टाकले. इरफान खान आणि मोहम्मद अली यांनी अनुक्रमे ५ आणि ४ वाइड बॉल टाकल्याचे पाहायला मिळाले.
धावांचा पाठलाग करताना फक्त दोघांची अर्धशतकी खेळी
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाकडून बाबर आझम याने ८३ चेंडूत केलेल्या ७८ धावांची खेळी आणि सलमान आगानं केलेल्या ४८ चेंडूतील ५८ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी पाकिस्तानच्या संघावर ७३ धावांनी पराभूत होण्याची वेळ आली.