NZ vs PAK : केन विलियम्सनचे विक्रमी द्विशतक; पाकिस्तानी गोलंदाज हतबल

न्यूझीलंड संघाचा केन विलियम्सननं ( Kane Williamson) २०२१ वर्षात पहिल्या शतकाचा, द्विशतकाचा मान पटकावला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 5, 2021 09:51 AM2021-01-05T09:51:03+5:302021-01-05T09:51:35+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs PAK : 4th double century in Tests for Kane Williamson, 200* from 327 balls including 24 fours against Pakistan 2nd Test | NZ vs PAK : केन विलियम्सनचे विक्रमी द्विशतक; पाकिस्तानी गोलंदाज हतबल

NZ vs PAK : केन विलियम्सनचे विक्रमी द्विशतक; पाकिस्तानी गोलंदाज हतबल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड संघाचा केन विलियम्सननं ( Kane Williamson) २०२१ वर्षात पहिल्या शतकाचा, द्विशतकाचा मान पटकावला. सातत्यपूर्ण कामगिरी करताना केननं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांना हतबल केले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २९७ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडचे ३ फलंदाज ७१ धावांत तंबूत परतले होते. पण, केन आणि हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी ३६९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. निकोल्स माघारी परतल्यानंतर केननं पाकिस्तानचा समाचार घेतला आणि द्विशतक पूर्ण केलं.


अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. पण, विलियम्सन व निकोल्स यांनी पाकिस्तानी संघाची हवाच काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अफलातून फलंदाजी केली. त्यांच्या ३६९ धावांच्या भागीदारीमुळे संघानं ५०० धावांचा पल्ला ओलांडला. 

निकोल्स २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार मारून १५७ धावांवर माघारी परतला. दुसरीकडे विलियम्सन खेळपट्टीवर नांगर रोवून उभाच होता.  १४८ षटकानंतर विलियम्सन ३६१ चेंडूंत २८ चौकारांसह २३६ धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडच्या ५ बाद ५८१ धावा झाल्या असून त्यांनी २८४ धावांची आघाडी घेतली आहे. 

केन विलियम्सची विक्रमी कामगिरी
 - घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतकं
- न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ४ द्विशतक करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी  ( ब्रेंडन मॅकलम) 
- न्यूझीलंडसाठी सर्वात जलद ७००० कसोटी धावा करणारा फलंदाज 
- न्यूझीलंडकडून ३००० कसोटी धावा करणारा दुसरा कर्णधार
 - घरच्या मैदानावर कसोटीत २००० धावा करणारा पहिला कर्णधार 
 

Web Title: NZ vs PAK : 4th double century in Tests for Kane Williamson, 200* from 327 balls including 24 fours against Pakistan 2nd Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.