Shaheen Afridi Trolled After Tim Seifert Hits 4 Sixes In An Over : न्यूझीलंडच्या ताफ्यातील टिम सिफर्ट (Tim Seifert) याने पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. किवींच्या ताफ्यातील सलामीवीरानं २२ चेंडूत केलेल्या ४५ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. यातील ४ षटकार त्याने शाहीन शाह आफ्रिदीच्या एका षटकात मारले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टिम सिफर्टनं केलेल्या धुलाईनंतर शाहीन शाह आफ्रिदी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. नेटकरी सोशल मीडियावर पाकच्या जलगदती गोलंदाजाची अक्षरश: लायकी काढताना दिसते.
पाकिस्तानच्या प्रमुख गोलंदाजाचा खुळखुळा
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी २० सामना हा ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी १५-१५ षटकांचाच खेळवण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं १३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम सिफर्टनं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाजालाच टार्गेट केले.
शाहीन शाह आफ्रिदीनं पहिलं षटक निर्धाव टाकले, पण...
पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीनं पहिल्या षटकात टिम सिफर्टला एकही धाव करून दिली नाही. षटक निर्धाव टाकत त्यानं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण दुसऱ्या षटकापासून न्यूझीलंड सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करण्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डावातील दुसऱ्या षटकात फिन एलन याने मोहम्मद अलीच्या षटकात ३ उत्तुंग षटकार मारत पहिल्या षटकातील भरपाई केली. त्यानंतर पुन्हा गोलंदाजीला आलेल्या शाहीन शाह आफ्रिदीवर टिम सिफर्ट तुटून पडला. शाहीन शाह आफ्रिदीच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात किवी सलामीवीरानं चार षटकार मारले. शाहीन शाह आफ्रिदीच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात किवी सलामीवीरानं चार षटकार मारले. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीनं ३ षटकात ३१ धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट मिळाली.
कामगिरीतील सातत्याचा अभाव, पुन्हा ठरला फुसका बार
सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिल्यावर न्यूझीलंडच्या संघानं हा सामना १४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर खिशात घालत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर पाक संघातील स्टार गोलंदाजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यामागचं कारण पाकिस्तान संघातील एन्ट्रीनंतर या गोलंदाजाने चांगलीच हवा केली होती. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो मागील काही दिवसांपासून सातत्याने फुसका बार ठरलाय, याच मुद्यावर नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसते.