गेल्या पंधरवड्यापासून सुरु असलेला टी२० वर्ल्डकप आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सेमीतून अक्षरश: बाहेर पडलेली पाकिस्तानची टीम चमत्कारीकरित्या सेमीमध्ये पोहोचली आहे. उद्या या संघाचा सामना तगड्या न्यूझीलंडसोबत असणार आहे. या चषकातील काही सामन्यांमध्ये पावसाने गोंधळ घातला आहे. यातच न्यूझीलंड-पाकिस्तान संघाच्या सामन्यातही पाऊस गोंधळ घालणार का? असा प्रश्न क्रिकेट विश्वाला पडला आहे.
NZ vs PAK चा सामना फायनलमध्ये कोण जाणार हे ठरविणारा आहे. दुसरीकडे भारत आणि इग्लंड असा सामना होणार आहे. या दोन सामन्यांतील विजेते फायनलमध्ये भिडणार आहेत. असे असताना जर पावसाने सामान फिरविला तर एका संघाचे सेमीत जाण्याचे स्वप्न न खेळताच भंगणार आहे. सुपर १२ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने अनेक तगड्या संघांना मात दिली आहे. तर पाकिस्तानने साध्या संघाकडूनही हार पत्करली आहे.
पाकिस्तानचा संघ नेदरलँडच्या उपकारांमुळे सेमीला पोहोचला आहे. नेदरलँडने चोकर्स द आफ्रिकेला हरवून पाकिस्तानला सेमीत ढकलले आहे. आता पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तगड्या न्यूझीलंडला हरवावे लागणार आहे. बाबर आझम तर पुन्हा काही चमत्कार होतोय का याचीच वाट पाहत आहे. असे असताना ऑस्ट्रेलियाच्या सरकारी हवामान विभागाने बुधवारी सिडनीतील हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.
सिडनीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही २० टक्के आहे. तापमान 23 डिग्री सेल्सियस असेल. यामुळे पावसामुळे सामना प्रभावित होण्याची शक्यता कमी आहे. मॅच स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता खेळविली जाईल. तर अॅक्यू वेदरनुसार देखील मॅचच्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे.
प्लेइंग इलेव्हन :
न्यूझीलंड: केन विल्यमसन (क), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी , टीम साउथी.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, मोहम्मद हॅरिस