Join us  

न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला

न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:50 PM

Open in App

NZ vs PNG T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवला. ल्युकी फर्ग्युसनने ( Lockie Ferguson ) अविश्वसनीय गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत एकही धाव न देता ३ विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.   

४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 

PNG चा सलामीवीर टॉनी उरा ( १) व कर्णधार आसाद वाला ( ६) हे अपयशी ठरले. चार्ल्स आमिनी व सेसे बाऊ यांनी PNG चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु १२ व्या षटकात फर्ग्युसनने ही जोडी तोडताना आमिनीला ( १७) पायचीत केले. फर्ग्युसनने त्याच्या पुढच्या षटकात चॅड सोपरचा ( १) त्रिफळा उडवला. फर्ग्युसनने त्याच्या ४ षटकांत एकही धाव न देता ३ विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात प्रथमच एका गोलंदाजाने सामन्यात चारही षटकं निर्धाव टाकली. ट्रेंट बोल्टने त्याच्या ४ षटकांत १४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. टीम साऊदी ( २-११) व ईश सोढी ( २-२९) यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेताना PNG चा संपूर्ण संघ ७८ धावांत तंबूत पाठवला.

 लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फिन अॅलन ( ०) व रचीन रवींद्र ( ६ ) हे लगेच माघारी परतले. डेव्हॉन कॉनवे ३२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावांवर पायचीत झाला, तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद ५४ धावा झाल्या होत्या. केन विलियम्सन ( १८) व डॅरील मिचेल ( १९) यांनी चांगला खेळ करताना न्यूझीलंडला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. किवींनी १२.२ षटकांत ३ बाद ७९ धावा करून सामना जिंकला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024न्यूझीलंड